आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआयसीसीने मंगळवारी फेब्रुवारी महिन्याच्या ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कारासाठी तीन खेळाडूंना नामांकन दिले. या स्पर्धेत भारताचा रवींद्र जडेजा, इंग्लंडचा हॅरी ब्रुक आणि वेस्टइंडीजचा गुडाकेश मोतीही आहे. अष्टपैलू जडेजाने दुखपतीनंतर जोरदार पुनरागमन केले. बॉर्डर-गावस्कर चषकातील पहिल्या दोन कसोटीत तो ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा मानकरी ठरला. त्याने पहिल्या कसोटीत ७ आणि दुसऱ्या कसोटीत १० गडी बाद केले. तिसऱ्या सामन्यातही ४ बळी मिळवले. तीन सामन्यांच्या चार डावात त्याने १०७ धावा केल्या.
दुसरीकडे ब्रुकने न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीत दोन्ही डावात अर्धशतक ठोकले. त्याने दुसऱ्या कसोटीत १७६ चेंडूत १८६ धावा तडकावल्या. ती त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी. तो मालिकावीर पुरस्कार विजेताही ठरला. त्याला डिसेंबर २०२२ मध्ये ‘आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ’चा पुरस्कार मिळाला होता. विंडीजचा फिरकीपटू गुडाकेशने झिम्बॉब्वेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १९ बळी घेतले होते. आयसीसीने महिलांच्या पुरस्कारासाठी ऑस्ट्रेलियन अॅश्ले गार्डनर, इंग्लंडची नॅट स्कीवर ब्रंट आणि दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वॉल्वार्टला नामांकित केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.