आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Ravindra Jadeja Wife Rivaba Clash With Lady Constable Sonal Gosai For Not Wearing Mask News Updates

वाद:मास्क न घालण्यावरुन क्रिकेटर रविंद्र जडेजाची महिला पोलिस कर्मचाऱ्यासोबत शाब्दिक चकमक

राजकोट3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय क्रिकेट संघाचा ऑलराउंडर रविंद्र जडेजाची राजकोटमध्ये मास्क घालण्यावरुन एका महिला पोलिस कर्मचाऱ्यासोबत बाचाबाची झाली. वाद वाढल्यानंतर महिला कर्मचाऱ्यास ताण आला आणि रुग्णालयात भरती व्हावे लागले. डेप्यूटी कमिश्नर मनोहरसिंह जडेजा यांनी याबाबत सांगितले की, अद्याप याप्रकरणी कोणीच तक्रार दाखल केलेली नाही.

सूत्रांनी सांगितले की, जडेजा पत्नी रिवाबासोबत कारमध्ये फिरायला गेला होता. यावेळी दोघांनी मास्क घातलेला नव्हता, त्यामुळे हेड कॉन्स्टेबल सोनल गोसाई यांनी त्यांना थांबवले आणि मास्क न घातल्यामुळे दंड लावला. यादरम्यान शाब्दिक बाचाबाची झाली. यादरम्यान महिला पोलिसाने वाईट वागणुक दिल्याचा आरोप जडेजाने केला आहे. या वादानंतर सोनल यांना खूप ताण आला आणि त्यांना हॉस्पीटलमध्ये भरती व्हावे लागले.

जडेजाने मास्क घातला होता

याबाबत डेप्यूटी कमिश्नर म्हणाले की, ‘‘जडेजा आणि हेड कॉन्स्टेबलने एकमेकांविरोधात वाईट वागणुक केल्याचा आरोप लावला आहे. परंतू, दोघांनी अद्याप कोणतीच पोलिस तक्रार केलेली नाही. मला मिळालेल्या माहितीनुसार, जडेजाने मास्क घातला होता, पण त्याच्या पत्नीने मास्क घातला होता का, याबाबत तपास केला जात आहे.’’