आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहत्त्वाच्या काही कडक कारवाईमुळे करिअरला कलाटणी बसली आणि त्यामुळे राेनाल्डाेला फुटबाॅलच्या विश्वात आपली वेगळी आेळख निर्माण करता आली, याची माहिती ‘मेसी-राेनाल्डाे : वन रायव्हरी, टू गाेट्स, अँड द इरा दॅट रिमेड द वर्ल्ड गेम’ नावाच्या पुस्तकात देण्यात आली आहे. राेनाल्डाेला २००७ मध्ये मँचेस्टर युनायटेड क्लबकडून खेळताना गैरवर्तन महागात पडले. यातून त्याला पाेर्टसमाऊथ संघाविरुद्ध रेड कार्ड मिळाले. यातून त्याच्यावर चार सामन्यांच्या बंदीची कारवाई करण्यात आली. यामुळे ताे काहीसा निराश झाला हाेता. मात्र, गाेल करताना झालेल्या गैरवर्तनाने त्याला बरेच काही शिकता आले. याच रेड कार्डला त्याने आदर्श मानत गाेल करण्याच्या शैलीचा दर्जा उंचावण्याासाठी प्रचंड मेनहन घेतली. यासाठी त्याने तीन झाेनमध्ये सराव केला. याच नित्याच्या सरावातून त्याला गाेल करण्याची वेगळी शैली आत्मसात करता आली. या वेळी केलेल्या सरावादरम्यान त्याने जवळपास ५ हजारांपेक्षा अधिक गाेल केले. त्यामुळेच ताे वेगवान पद्धतीने गाेल करण्यात आता अधिक तरबेज झाला आहे.
राेनाल्डाेने महिनाभर कसून सराव केला हाेता. त्याने टेक्निकल आणि रिकव्हरी सेशनमध्येही सहभाग घेतला नाही. ताे फक्त सरावाच्या ठिकाणीच हजेरी लावू लागला. यादरम्यान त्याला युनायटेडचे काेच रेने मेलेनस्टिन यांचे माेलाचे सहकार्य मिळाले. त्यांनी मार्गदर्शन करून राेनाल्डाेच्या गाेलच्या शैलीचा दर्जा उंचावला. यासाठी त्यांनी खास तीन झाेन तयार केले. याच्या माध्यमातून त्याला गाेल करण्याचा दर्जा उंचावता आला. त्यानंतर पुनरागमन करत त्याने २००७-०८ च्या सत्रात ३१ सामन्यांमध्ये ४२ गाेल केले हाेते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.