आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआयपीएल-16 मधील 60 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने राजस्थान रॉयल्सवर 112 धावांनी विराट विजय मिळवला. सवाई मानसिंग स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात बंगळुरूने विजयासाठी दिलेल्या 172 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानला 10.3 षटकांत सर्व गडी गमावून केवळ 59 धावांपर्यंतच मजल मारता आली.
राजस्थानच्या फलंदाजांचे लोटांगण
राजस्थानकडून शिमरॉन हेटमायरने सर्वाधिक 35 धावा केल्या. तर जो रूटने 10, संजू सॅमसन आणि देवदत्त पडिक्कलने प्रत्येकी 4, एडम झम्पाने 2, ध्रुव जुरेलने 1, तर यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, आर अश्विन, केएम आसिफ हे चार फलंदाज शून्यावर बाद झाले. संदीप शर्मा शून्यावर नाबाद राहिला. बंगळुरूकडून वेन पार्नेलने 3, मायकेल ब्रेसवेल आणि कर्ण शर्माने प्रत्येकी 2, ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी 1 विकेट घेतली. तत्पूर्वी बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 5 गडी गमावून 171 धावा करत राजस्थानला विजयासाठी 172 धावांचे आव्हान दिले.
पाहा सामन्याचा लाइव्ह स्कोअरकार्ड
अशा पडल्या राजस्थानच्या विकेट
डु प्लेसिस-मॅक्सवेलची फिफ्टी
बंगळुरूकडून फाफ डु प्लेसिसने सर्वाधिक 55 धावा केल्या. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने 54, अनुज रावतने 29, विराट कोहलीने 18 धावा केल्या. राजस्थानकडून एडम झम्पा आणि केएम आसिफने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. तर संदीप शर्माने 1 विकेट घेतली.
बंगळुरूचा डाव
प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूला ओपनर विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिसने चांगली सुरूवात करून दिली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी 50 धावांची भागीदारी केली. सातव्या षटकात विराट कोहलीला 18 धावांवर बाद करत केएम आसिफने ही जोडी फोडली. त्यानंतर डु प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेलने डाव पुढे नेत दुसऱ्या गड्यासाठी 69 धावांची भागीदारी केली. पंधराव्या षटकात डु प्लेसिसला बाद करत आसिफनेच ही जोडी फोडली. त्यानंतर पुढच्याच षटकात एडम झम्पाने महिपाल लोमरोरला 1 धावेवर तर दिनेश कार्तिकला शून्यावर बाद केले. यानंतर अठराव्या षटकात संदीप शर्माने ग्लेन मॅक्सवेलला 54 धावांवर बाद केले. यानंतर अनुज रावत आणि मायकल ब्रेसवेलने शेवटपर्यंत नाबाद राहत संघाची धावसंख्या 171 वर नेली.
अशा पडल्या बंगळुरूच्या विकेट
राजस्थानने 12 पैकी 6 सामने जिंकले
राजस्थानने या मोसमात आतापर्यंत 12 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये संघाने 6 जिंकले आहेत आणि तेवढेच सामने गमावले आहेत. संघाचे सध्या 12 गुण आहेत. बेंगळुरूविरुद्ध संघाचे चार विदेशी खेळाडू जॉस बटलर, जो रूट, शिमरॉन हेटमायर आणि ट्रेंट बोल्ट असू शकतात. याशिवाय यशस्वी जैस्वाल, युझवेंद्र चहल आणि संजू सॅमसन हे खेळाडू उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत.
बेंगळुरूने 11 पैकी 5 सामने जिंकले
या मोसमात आतापर्यंत खेळलेल्या ११ सामन्यांपैकी बंगळुरूने 5 जिंकले आहेत आणि 6 गमावले आहेत. संघाचे 10 गुण आहेत. राजस्थानविरुद्धच्या संघाचे चार विदेशी खेळाडू फाफ डू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, वनिंदू हसरंगा आणि जोश हेझलवूड असू शकतात. याशिवाय विराट कोहली, मोहम्मद सिराज आणि हर्षल पटेल या मोठ्या खेळाडूंचा संघात समावेश आहे.
हेड टू हेड
हेड टू हेड बद्दल बोलायचे झाले तर राजस्थान आणि बेंगळुरू यांच्यात आतापर्यंत एकूण 29 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी 14 सामने बेंगळुरूने आणि 12 सामने राजस्थानने जिंकले आहेत, तर तीन सामने अनिर्णित राहिले.
खेळपट्टीचा अहवाल
सवाई मानसिंग स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांना खूप आवडते. येथील गोलंदाजासाठी हे थोडे कठीण आहे.
हवामान स्थिती
रविवारी जयपूरमधील हवामान स्वच्छ असणार आहे. जोरदार वारे वाहू शकतात. दुपारचे तापमान 37 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील.
दोन्ही संघातील प्लेइंग- 11
राजस्थान रॉयल्स :
संजू सॅमसन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, जो रूट, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, केएम आसिफ संदीप शर्मा आणि युझवेंद्र चहल.
इम्पॅक्टफूल प्लेयर : देवदत्त पडिक्कल, अॅडम झाम्पा, रियान पराग, जेसन होल्डर, ओबेद मॅकॉय.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू :
फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), वनिंदू हसरंगा, हर्षल पटेल, विजयकुमार वैशाख, मोहम्मद सिराज आणि जोश हेजलवूड.
इम्पॅक्टफूल प्लेयर : केदार जाधव, फिन ऍलन, कर्ण शर्मा, आकाशदीप.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.