आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Real Madrid Won 10 Matches, The 34th Time Champions; This Is Real's First Book In Three Years

फुटबॉल:रिअल माद्रिदने 10 सामने जिंकले, 34 व्या वेळी चॅम्पियन; हा रिअलचा तीन वर्षांतील पहिला किताब

माद्रिद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रिअल माद्रिदने विलारियलला 2-1 ने हरवले, 1 सामना शिल्लक ठेवून किताब जिंकला

स्पेनचा फुटबॉल क्लब रियल माद्रिदने घरची स्पर्धा ला लिगाचा किताब जिंकला. रियल माद्रिदने विलारियलला २-१ ने हरवत ३४ व्या वेळी किताब आपल्या नावे केला. रिअल माद्रिदच्या नावे सर्वाधिक वेळा किताब जिंकण्याचा विक्रम आहे. रिअल माद्रिद एक सामना शिल्लक ठेवून चॅम्पियन बनला. फुटबॉल पुन्हा सुरू झाल्यानंतर रिअलने सर्व १० सामने जिंकले. क्लबने ३३ दिवसांत हे सामने जिंकले. हा रिअलचा तीन वर्षांत पहिला किताब ठरला, झिनेदीन झिदानच्या मार्गदर्शनात दुसरा.

घरच्या मैदानावर रिअलकडून करीम बेंजेमाने २९ व्या आणि ७७ व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल केला. दुसरीकडे, विलारियलसाठी एकमेव गोल विसेंन्ट इबोराने ८३ व्या मिनिटाला केला.

घरच्या मैदानावर बार्सिलोना पराभूत; मेसीचा गाेल ठरला व्यर्थ

गत चॅम्पियन बार्सिलोनाला घरच्या मैदानावर आेसासुनाने २-१ ने हरवले. ओसासुनासाठी जोस अरनेजने १५ व्या, रॉबर्टो टॉरेसने ९०+४ व्या मिनिटाला गोल केला. बार्सिलोनाकडून लियोनेल मेसीने ६२ व्या मिनिटाला गोल नोंदवला. आेसासुनाच्या एनरिक गालेगोला ७७ व्या मिनिटाला रेड कार्ड दाखवले, त्यानंतरही बार्सिलोना त्याचा फायदा घेऊ शकले नाही. बार्सिलोनाच्या या पराभवामुळे रिअलने पुढील सामना न खेळताच किताब आपल्या नावे केला.