आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Record Performance Of Aurangabad's Giryarahak Ambadas On Independence Day

गिर्यारोहक:युराेपातील सर्वात उंच ‘एल्ब्रुस’ केले सर; आता आकोंकाग्वाची माेहीम जानेवारीत करणार फत्ते

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • औरंगाबादच्या गिर्याराेहक अंबादासची स्वातंत्र्यदिनी विक्रमी कामगिरीची नाेंद

औरंगाबादच्या गिर्याराेहक अंबादास गायकवाडने युराेपातील सर्वात उंच माउंट एल्ब्रुस यशस्वीपणे सर करण्याचा पराक्रम गाजवला. विक्रमी कामगिरीला गवसणी घालणाऱ्या या ध्येयवेड्या गिर्याराेहकाने स्वातंत्र्यदिनी सकाळी १८ हजार ५१० फूट उंचीच्या माउंटवर तिरंगा फडकवला. ही कामगिरी करणारा तो महाराष्ट्रातील पहिला गिर्याराेहक ठरला. हा खडतर पल्ला गाठताना त्याच्यावर दाेन वेळा आव्हानात्मक परिस्थिती आेढवली हाेती. मात्र, माेठ्या धाडसाने यातून यशस्वीपणे सावरत त्याने हा पल्ला गाठून विक्रम नाेंदवला. त्याने करिअरमधील दुसरे आंतरराष्ट्रीय शिखर सर केले आहे.

आता पुढच्या वर्षी जानेवारीत आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अंबादास दक्षिण अमेरिकेतील २३ हजार फूट उंचीचे आकोंकाग्वा शिखर सर करण्याची माेहीम फत्ते करणार आहे. ‘युराेपातील माउंट सर केल्यानंतर मायदेशात परतल्यानंतर तिसऱ्या माेहिमेला सुरुवात करणार आहे. याची वाट अधिक खडतर आहे. मात्र, त्यासाठी प्रचंड मेहनत घेणार आहे. यातून मला तिसरी माेहीम फत्ते करता येईल, असा विश्वास गिर्याराेहक अंबादासने ‘दिव्य मराठी’शी बाेलताना व्यक्त केला. येत्या शुक्रवारी ताे मायदेशी परतणार आहे.

माेहिमेत दोन वेळेस पाचशे फूट दरीत कोसळताना वाचला
गिर्यारोहक अंबादास गायकवाडने स्वातंत्र्यदिनी युरोप खंडातील सर्वोच्च माउंट एल्ब्रुस (रशिया) शिखर सर करून तिरंगा फडकवला. हे शिखर समुद्रसपाटीपासून १८ हजार ५१० फूट उंचीचे आहे. ताे मोहिमेदरम्यान दोन वेळेस पाचशे फूट दरीत कोसळताना वाचला व मोहीम यशस्वी करून परतला. युरोप खंडातील सर्वोच्च १८ हजार ५१० फूट उंचीच्या माउंट एल्ब्रुस या शिखरासाठी प्रत्यक्षात चढाई १२ ऑगस्ट रोजी आझू या टाऊनपासून सुरू केली होती. बारा तारखेला कॅम्प एक व तेरा तारखेला बेस कॅम्पवर तो पोहोचला. १४ तारखेला रात्री ११ वाजता पुन्हा चढाई सुरू केली होती. कमाल २० तापमान, सुसाट वाऱ्यात सकाळी नऊ वाजल्यापासून स्नो फॉल चालू होते. १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी सकाळी ८.१५ वाजता शिखर माथा गाठले.

वादळ, बर्फाच्या पावसात जीवघेणा थरारक प्रवास
‘परतीच्या प्रवासादरम्यान बर्फाचा पाऊस व जोराच्या वाऱ्याचा वेग वाढतच होता. शेवटी गाइडने निघण्याचा निराेप सॅटेलाइट फोन, वॉकी-टॉकीवर दिला. वादळात रस्ता चुकलो. पायाची तीन बोटे सुन्न पडली होती. वादळ वाढतच चालले होते. समोरचे काही दिसेनासे झाले. चार तास बर्फावर तसेच बर्फात रोवून पडून राहिलो. अंबादास गायकवाड, गिर्याराेहक, आैरंगाबाद

बातम्या आणखी आहेत...