आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शालेय विभागीय हॉकी स्‍पर्धा:रेजिमेंटलची हॉकीत विजेतेपदाची हॅट‌्ट्रिक

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित शालेय विभागीय हॉकी स्पर्धेत रेजिमेंटल हायस्कूलच्या संघाने शानदार कामगिरी करत विजेतेपदाची हॅट‌्ट्रिक साधली. रेजिमेंटलच्या १४ वर्षाखालील मुले व मुली आणि १७ वर्षाखालील मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला.

विभागीय क्रीडा संकुल येथे झालेल्या स्पर्धेत १७ वर्ष मुलींच्या अंतिम लढतीत औरंगाबादचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या रेजिमेंटल हायस्कूलने जालन्यावर ७-० गोलने विजय मिळवला. विजेत्या संघाकडून कर्णधार भावना सिंगच्या सुरेख पासवर श्रृती भागडेने गोलची हॅट‌्ट्रिक साधली. सिमरन खुळेने एक गोल केला. मुलींच्या १४ वर्षाखालील गटात अंतिम लढतीत रेजिमेंटल हायस्कूलने जालन्याच्या लिटिल स्टार स्कूलच्या संघावर ४-१ गाेलने विजय मिळवला. विजेत्या संघाला क्रीडा शिक्षक संजय तोटावाड व प्रशिक्षक अकबर खान यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी संघाला शाळेचे मुख्याध्यापक नामदेव सोनवणे यांनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...