आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेजर सय्यदा म्‍हणाल्‍या:खेळाडूंचे रिहॅबिलिटेशन करावे

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘बेटी पढाव, बेटी बचाव’बरोबरच महिला खेळाडूंना सशक्त बनण्यासाठी निवृत्त खेळाडूंचे रिहॅबिलिटेशन करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सय्यदा फिरासत यांनी केले. त्या क्रीडा भरतीतर्फे महिला खेळाडूंच्या सर्वेक्षणासाठी आयोजित प्रशिक्षण शिबिरामध्ये बोलत होत्या.

या संशोधन कार्यामधील मेथोडोलॉजी व टेक्नॉलॉजी कशा पद्धतीने वापरावे आणि संशोधन कार्य कसे करावे याकरता क्रीडा भारतीच्या वतीने धर्मवीर संभाजी विद्यालयात महिला प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन औरंगाबाद जिल्ह्याच्या सैनिक कल्याण अधिकारी मेजर सय्यदा फिरासत यांचे हस्ते झाले. या वेळी या प्रशिक्षण वर्गाचे मुख्य मार्गदर्शक विजय पुरंदरे, क्रीडा भारतीचे अध्यक्ष पंकज भारसाखळे, मातृशक्तीच्या प्रांत संयोजिका डॉ. मीनाक्षी मुलियार यांची प्रमुख उपस्थिती होती.

महिला खेळाडूंचे सर्वेक्षण : महिला आयोगाच्या निर्देशानुसार क्रीडा भारती व भारतीय स्त्रीशक्ती संघटनेतर्फे महिला खेळाडूंचे सर्वेक्षण केले जात आहे. यात महिला खेळाडूंना येणाऱ्या सामाजिक, आर्थिक अडचणी, प्रशिक्षण व आहार समस्यावर अभ्यास करुन त्यावर उपाय केंद्राला सुचवले जाईल.

बातम्या आणखी आहेत...