आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासामनावीर यशस्वी जयस्वाल (१४४) आणि साैरभ कुमार (३/६०), नारंग (२/२७), अतित (२/३७), मुकेश कुमारच्या (२/३४) सर्वाेत्तम खेळीतून शेष भारत संघाने इराणी चषक पटकावला. मयंक अग्रवालच्या नेतृत्वाखाली शेष भारत संघाने रविवारी सामन्यात मध्य प्रदेशवर मात केली. शेष भारताने २३८ धावांनी सामना जिंकला. यासह शेष भारत संघ ३० वेळा या किताबाचा मानकरी ठरला आहे. विजयाच्या खडतर ४३७ धावांच्या प्रत्युत्तरात मध्य प्रदेश संघाला १९८ धावांवर दुसऱ्या डावात गाशा गुंडाळावा लागला. सामन्यात द्विशतक आणि शतकातून सर्वाधिक ३७५ धावा काढणारा युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. त्याने पहिल्या डावात द्विशतक आणि दुसऱ्या डावात शतक साजरे केले हाेते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.