आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Retired After Much Thought Now Federer Has His Sights Set On Finding A New Superstar For His Own Country

खूप विचार केल्यानंतर निवृत्तीवर लिहिले:आता फेडररची नजर आपल्याच देशाचा नवा सुपरस्टार शोधण्यावर

लंडन6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रॉजर फेडररचे म्हणणे आहे की, दुखापतीमुळे आता खेळू शकणार नाही असे वाटले होते तेव्हाच मी निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. २३ सप्टेंबरपासून सुरू होणारा लेव्हर चषक अखेरची एटीपी स्पर्धा असेल, अशी घोषणा फेडररने गेल्या आठवड्यात केली. ४१ वर्षांचा स्विस टेनिसपटू फेडररने गेल्या वर्षी विम्बलडननंतर कोणतीच स्पर्धा खेळली नाही. तेव्हा त्याच्या गुडघ्यावर तिसरी शस्त्रक्रिया झाली होती. तो म्हणाला, ‘मागील ३ वर्षे माझ्यासाठी खूप कठीण राहिले. प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास परत येण्याचा प्रयत्न केला होता, पण माझ्याही काही मर्यादा आहेत.’

काही महिन्यांपूर्वी माझे स्कॅन झाले होते. जशी अपेक्षा होती तसे त्याचे रिपोर्ट्स नव्हते. लवकरच मला याची जाणीव झाली होती. तेव्हा मला वाटले होते की, आता निवृत्ती घेतली पाहिजे. मग प्रश्न होता की, तुम्ही निवृत्तीची घोषणा कधी व कसे करता? हा काळ तणावात गेला.’ - रॉजर फेडरर

फेडरर म्हणतो, मी निवृत्तीनंतर कोणतीच खास योजना आखली नाही. स्वित्झर्लंडमधील टेनिस युवा प्रतिभावंतांना समोर आणण्यासाठी प्रशिक्षण देण्याचे संकेतही त्याने दिले आहेत. तथापि, पत्नी मिर्का आणि चार मुलांसोबत वेळ घालवणे हा त्याचा पहिला प्लॅन आहे. तो म्हणाला, ‘मला स्वित्झर्लंडमधून नवे स्टार्स शोधायचे आहेत.

निवृत्तीच्या विचारांपासून नेहमी दूर राहिलो फेडररने सोशल मीडियावर पाच पानांची चिठ्ठी लिहून निवृत्तीची घोषणा केली होती. तो म्हणाला, ‘ते शब्द लिहिण्यासाठी मला अनेक आठवडे लागले. तो काळ माझ्यासाठी खूप भावनात्मक होता. जसे जाणवत आहे तसेच शब्द लिहिण्याची माझी इच्छा होती. हे शब्द माझ्यासाठी पुनर्वसनाप्रामाणे होते. मी नेहमीच आपल्या निवृत्तीच्या विचारांपासून दूर राहिलो.

अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळवले याचा आनंद -फेडरर सांगतो, मी कधी कल्पना केली नव्हती की, इतके यश मिळेल. इतके सर्व मिळवू शकलो याचा मला खूप आनंद आहे.

-स्विस किंग ३१० आठवडे वर्ल्ड नंबर-१ राहिला. यात २३७ आठवडे लागोपाठ टॉपवर होता. त्याने १०३ एटीपी किताब जिंकले. फेडरर म्हणतो, ‘स्वित्झर्लंड या छोट्याशा देशाला माझ्याकडून सुरुवातीला छोट्या-छोट्या अपेक्षाच होत्या. माझ्यासाठी टॉप-१०० मध्ये स्थान निर्माण करणेच खूप मोठी गोष्ट होती. मी जी स्वप्ने पाहिली त्यापेक्षा जास्त पूर्ण झाली.

बातम्या आणखी आहेत...