आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगातील नंबर वन नोवाक योकोविकने गुरुवारी माद्रिद ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीचा पल्ला गाठला. दरम्यान, पाच वेळच्या चॅम्पियन राफेल नदालने प्री क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. सामना न खेळताच तीन वेळच्या किताब विजेत्या योकोविकला अंतिम आठमधील आपला प्रवेश निश्चित करता आला. त्याचा सामना इंग्लंडच्या अँडी मरेशी हाेणार हाेता. मात्र, दाेन वेळच्या चॅम्पियन मरेने आजारपणामुळे एेनवेळी सामन्यातून माघार घेतली. त्यामुळे सर्बियाच्या योकोविकला विजयी घाेषित करण्यात अाले. तिसऱ्या मानांकित नदालने पुरुष एकेरीच्या सामन्यामध्ये सर्बियाच्या मियोमिर केसमोनोविकला पराभूत केेले. त्याने सरळ दाेन सेटमध्ये ६-१, ७-६ ने सामना जिंकला. यासह त्याला आगेकूच कायम ठेवता आली. आता त्याचा सामना बेल्जियमच्या डेव्हिड गाॅफिनशी हाेणार आहे. चाैथ्या मानांकित सितसिपास, आठव्या मानांकित फेलिक्स आणि दहाव्या मानांकित जेनिक सिनरने सलग सेटमध्ये आपापल्या गटाचे सामने जिंकले. यासह हे सर्वजण प्री क्वार्टर फायनलमध्ये दाखल झाले आहेत. सितसिपासने आपल्या गटात फ्रान्सच्या लुकास पाऊलेवर ६-३, ६-४ ने मात केली. आता त्याचा सामना बुल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोवशी हाेईल. तसेच कॅनडाच्या फेलिक्सने लढतीत चिलीच्या क्रिस्टियनवर ६-३, ६-० ने एकतर्फी विजय संपादन केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.