आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविश्वचषकानंतर आता आंतरराष्ट्रीय फुटबाॅलचे दमदार पुनरागमन हाेत आहे. हे कमबॅक आता विक्रमाला गवसणी घालणारे ठरत आहे. फुटबाॅलच्या विश्वातील स्टार खेळाडूंच्या त्रिकुटाने मैदानावर उतरताच विक्रमाची नाेंद केली. यामध्ये पाेर्तुगालच्या क्रिस्टियानाे राेनाल्डाे, अर्जेंटिनाच्या लियाेनेल मेसी आणि इंग्लंडच्या हॅरी केनचा समावेश आहे. पाेर्तुगाल आणि लिकटेन्स्टाइन यांच्यात युराे कप २०२४ च्या पात्रता फेरी सामन्याने विक्रमाच्या थराराची सुरुवात झाली. पाेर्तुगाल संघाने ४-० अशा फरकाने पात्रता फेरीत एकतर्फी विजयाची नाेंद केली. जाेआओ कान्सेलाे (८ वा मि.), बर्नाडाे सिल्वा (४७ वा मि.) आणि राेनाल्डाे (५१, ६३ वा मि.) यांनी पाेर्तुगाल संघाचा विजय निश्चित केला. यादरम्यान राेनाल्डाेने ५१ व्या मिनिटाला पेनल्टीवर आणि ६३ व्या मिनिटाला फ्री किकवर गाेल केला. यासह या ३८ वर्षीय फुटबाॅलपटू् विक्रमी सर्वाधिक १९७ आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा जगातील एकमेव ठरला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.