आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Rinku Pavara Finished Second In The National Federation Cup Setting A Record In The 3,000 Meters; News And Live Updates

तळोदा:राष्ट्रीय फेडरेशन कपमध्ये रिंकू पावराने पटकावले दुसरे क्रमांक, 3 हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत केला विक्रम

तळोदा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोन वर्षांपूर्वी तिची सिंगापूर आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेसाठी निवड झाली होती

19 व्या राष्ट्रीय फेडरेशन कप अंडर 20 च्या 3000 मीटर धावण्याच्या शर्यतीत आक्रणी तालुक्यातील दुर्गम भागातील रिंकी पावरा या मुलीने द्वितीय क्रमांक पटकावला. अनु प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा, राजबर्डी ता. आक्रणी जि नंदुरबार येथील इयत्ता 12 वी कला येथे रिंकी शिकत आहे. तीच पूर्ण नाव कुमारी रिंकी धन्या पावरा पंजाब राज्यातील संग्रूर इथं तिने हा पराक्रम केला.

नैसर्गिक दृष्ट्या सुदृढ असणाऱ्या व काटक असणाऱ्या मुलांना संधी मिळाल्यास ते सोने करू शकतात याचा प्रत्यय पुन्हा एकदा रिंकी धन्या पावरा या सातपुड्यातील इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी दाखवला असून या अगोदर आसाम येथील गोवाहाटी येथे झालेला फिट इंडिया स्पर्धेत कास्य पदक मिळवून सातपुड्यातील खेळाडूंच्या अंगी असलेली गुणवत्ता सिद्ध केली होती.

रिंकी पावरा यांचे घर
रिंकी पावरा यांचे घर

नंदुरबार जिल्ह्यात धडगाव तालुक्यातील खर्डी या छोट्याशा गावात राहणाऱ्या रिंकू ने तीन हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत पदक पटकावले आहे. नाशिक येथील प्रशिक्षक विजेंदर सिंग यांनी तिला आपल्या अकादमीत प्रशिक्षणाची संधी दिली. दोन वर्षांपूर्वी तिची सिंगापूर आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेसाठी निवड झाली होती. मात्र यावेळी पासपोर्ट न मिळाल्यामुळे तिला या स्पर्धेत भाग घेता आले नाही.

बातम्या आणखी आहेत...