आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Rinku Singh Salary IPL 2023; Facts Related With Rinku Singh | KKR | Rinku Singh

IPL च्या रंजक कथा:शेवटच्या षटकात 5 उत्तुंग षटकार ठोकणाऱ्या रिंकू सिंहला KKR कडून 1 सामना खेळण्यासाठी किती मिळते मानधन?

स्पोर्ट्स डेस्क2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये रविवारी कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) व गुजरात टायटन्समध्ये (जीटी) झालेला सामना केकेआर व त्याचा स्टार क्रिकेटपटू रिंकू सिंह केव्हाच विसरू शकत नाही. या सामन्याच्या शेवटच्या षटकात रिंकूने सलग 5 षटकार ठोकत आपल्या संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

रिंकू सिंह या सामन्यात अशी कमाल करेल, याचा कुणी स्वप्नातही विचार केला नव्हता. पण त्याने ही आश्चर्यकारक खेळी करून सर्वांनाच तोंडात बोटे घालण्यास भाग पाडले. कधिकाळी कोचिंग सेंटरमध्ये झाडू-पोछा करणारा रिंकू या खेळीने रातोरात स्टार बनला. त्याच्या वादळी खेळीने त्याच्या चाहत्यांच्या मनातील स्थान अधिकच बळकट झाले. त्यामुळे या बातमीतून आपण रिंकू सिंहला आयपीएलच्या एका सामन्यासाठी आपल्या संघाकडून किती फिस मिळते हे पाहू...

शाहरुखचा विश्वास संपादन

शाहरूख खानच्या केकेआरने 2018 मध्ये रिंकू सिंहला आपल्या संघात स्थान दिले होते. तेव्हापासून आतापर्यंत रिंकू केकेआरसोबत आहे. यंदाच्या सलग 6 व्या हंगामात केकेआरने त्याला रिटेन केले. यंदाच्या आयपीएल लिलावात त्याला कमी किंमत मिळाली. पण त्याने गुजरात टायटन्सविरोधातील सामन्यात मॅच विनिंग खेळी करून केकेआरचा मालक शाहरुख खानचा विश्वास संपादन केला.

एका सामन्यासाठी मिळतात 4.23 लाख

गुजरात विरोधातील सामन्यात रिंकू सिंहने 21 चेंडूंत 48 धावा कुटल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये त्याने षटकारांचा पाऊस पाडत केवळ संघाला विजयच मिळवून दिला नाही, तर संपूर्ण चाहत्यांचेही मन जिंकले. आयपीएल-2023 मध्ये रिंकूला एक सामना खेळण्यासाठी जवळपास 4.23 लाख रुपये मिळतील.

याचा अर्थ एकूण 14 सामने खेळल्यानंतर रिंकूला केकेआरकडून 55 ते 56 लाख रुपयांची भरभक्कम रक्कम मिळेल. याशिवाय त्यांना त्यांच्या कामगिरीनुसार एखाद्या सामन्यात 6 लाख रुपयांची रक्कम अतिरिक्तही मिळू शकते. या पैशांशिवाय रिंकूला उर्वरित खेळाडूंसारखे पंचतारांकित हॉटेल्स, प्रायव्हेट जेट, खानेपिणे आदी सुविधाही मोफत मिळतील.

रिंकूने पळवला गुजरातच्या तोंडचा घास

प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने निर्धारित 20 षटकांत 4 गड्यांच्या मोबदल्यात 204 धावा केल्या होत्या. गुजरातकडून साई सुदर्शन व विजय शंकर यांनी अर्धशतकी खेळी खेळली. त्यानंतर 205 धावांचा पाठलाग करताना मैदानात उतरलेल्या केकेआरकडून व्यंकटेशन अय्यरने 40 चेंडूंत सर्वाधिक 83 धावा केल्या. कर्णधार नितीश राणाने 45 व अखेरीस रिंकू सिंहने 48 धावांची स्फोटक खेळी करून केकेआरला 3 गड्यांनी विजय मिळवून दिला.