आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Rinku Singh, The New Finisher Of IPL, Defeated Gujarat By Hitting 5 Sixes In The Last 5 Balls.

सिक्सर किंग रिंकू...:अखेरच्या 5 चेंडूत 5 षटकार खेचत गुजरातला नमवले,  आयपीएलचा नवा फिनिशर रिंकू सिंह

अहमदाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता नाइट रायडर्सचा फलंदाज रिंकू सिंहने रविवारी शेवटच्या षटकात लागोपाठ ५ षटकार खेचत गुजरात टायटन्सकडून विजय हिरावून घेतला. प्रथम फलंदाजी करत गुजरात टायटन्सने ४ गडी गमावत २०४ धावा केल्या. २०५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरने १९ षटकांत १७६ धावा केल्या होत्या. त्यानंतर शेवटचे षटक यश दयालने टाकले. पहिल्याच चेंडूत उमेश यादवने १ धाव घेतली. त्यानंतरच्या पाच चेंडूंत रिंकू सिंहने लागोपाठ ५ षटकार खेचत केकेआरला तीन गडी राखून विजय मिळवून दिला.

राशिदने केली हॅट््ट्रिक
गुजरात टायटन्सचा कर्णधार राशिद खानने हॅट््ट्रिक केली. ही यंदाच्या आयपीएलची पहिली हॅट््ट्रिक आहे. १७ वे षटक टाकत त्याने पहिल्या ३ चेंडूंवर आंद्रे रसेल (१), सुनील नरेन (०) व शार्दूल ठाकूरला (०) बाद करत गुजरातचा विजय जवळपास निश्चित केला होता. मात्र, रिंकूने तो हिरावून घेतला.{सविस्तर. स्पाेर्ट््स

सामन्यांचे निकाल
गुजरात vs केकेआर
204/4
204/4

पंजाब vs हैदराबाद

143/9
आजचा सामना : बंगळुरू लखनऊ सायं. ७.३० वा.