आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Rishabh Pant Car Accident; Rahul Dravid, Hardik Pandya, Yuzvendra Chahal | Team India | Rishabh Pant

टीम इंडिया म्हणाली- ऋषभ पंत फायटर:कोच द्रविडसह सर्वच खेळाडू म्हणाले - मिस यू; चहल म्हणाला - ये चौके-छक्के मारू

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
टीम इंडियाने एका व्हिडिओद्वारे ऋषभ पंतची लवकरात लवकर रिकव्हरी होण्याची आशा व्यक्त केली आहे. 

भारतीय क्रिकेट संघाने कार अपघात गंभीर झालेल्या यष्टिरक्षक ऋषभ पंत याच्या रिकव्हरीची अपेक्षा व्यक्त केली आहे. भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविडसह इतर सर्वच खेळाडूंनी यासंबंधीचा एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे. त्यात युजवेंद्र चहल पंतला लवकरात लवकर मैदानात परतून चौकार-षटकार मारण्याचा सल्ला देत आहे.

ऋषभ पंतचा 30 डिसेंबर रोजी दिल्लीहून रुरकीला जाताना अपघात झाला होता. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर डेहराडूनच्या मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याला आता ICU तून सामान्य वॉर्डात शिफ्ट करण्यात आले आहे.

पंतच्या अपघातानंतरचा व्हिडिओ, त्यात 2 जण त्याला आधार देताना दिसून येत आहेत...

वाचा पंतला टीम इंडिया काय म्हणाली...

द्रविड - तुझ्यात कठीण स्थितीचा सामना करण्याची ताकद

राहुल द्रविड म्हणाला, 'हॅलो ऋषभ, आशा आहे तू लवकर बरा होशील. मागील वर्षभरात कसोटी क्रिकेटमध्ये तुझ्या काही चांगल्या खेळी पाहण्याची संधी मिळाली हे मी माझे नशीब समजतो. अवघडात अवघड स्थितीतून बाहेर पडण्याची ताकद तुझ्यात आहे.'

हार्दिक- तू फायटर आहे, लवकर बरा होऊन परतशील

दुसरीकडे, हार्दिक म्हणाला, 'मी तू लवकर बरा होण्याची अपेक्षा व्यक्त करतो. तू एक फायटर असून, लवकर बरा होऊन मैदानात परत येशील असा मला विश्वास आहे संपूर्ण संघ व देश तुझ्यासोबत आहे.'

सूर्यकुमार यादव - तुझी आठवण येते, काळजी घे

श्रीलंकेविरोधातील टी-20 मालिकेसाठी प्रथमच टीम इंडियाचे उपकर्णधारपद भूषवणारा सूर्यकुमार यादव म्हणाला की, 'तू लवकर बरा व्हावा अशी आमची इच्छा आहे ऋषभ. पण स्थिती आम्हाला माहिती आहे. आम्हा सर्वांना तुझी आठवण येत आहे. काळजी घे. परत ये.'

ईशान, चहल व गिल- एकत्र खेळू, चौकार, षटकार मारू

युजवेंद्र चहल म्हणाला - 'भावा लवकर बरा होऊन ये. आपल्याला चौकार-षटकार मारायचेत.' दुसरीकडे, ईशान किशन व शुभमन गिल म्हणाले की, तू लवकर बरा होशील अशी आम्ही प्रार्थना करू. तू फायटर आहेस. आपण लवकरच एकत्र खेळू असा आम्हाला विश्वास आहे.

ऋषभ पंतच्या अपघाताच्या इतर बातम्या वाचा...

ऋषभ पंतचा अपघात, प्रत्यक्षदर्शींच्या शब्दांत:हायवेवरील खड्ड्यामुळे 5 फूट उसळून उलटली मर्सिडीझ, पंत स्वतः बाहेर आला... रस्त्यावर बसला

भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या मर्सिडीजने ताशी 150 किमी वेगाने येणाऱ्या कारला मागे टाकले. तेवढ्यात समोर एक खड्डा आला. त्यामुळे त्यांची कार 5 फुटांपर्यंत उडी मारून सर्वात आधी बसला धडकली... त्यानंतर दुभाजकावरून पुढे जात असताना कारला आग लागली. अपघाताच्या वेळी घटनास्थळी उपस्थित असलेले डॉ. रवींद्र सिंह आणि गंगा डेअरीमध्ये काम करणाऱ्या आर्यन यांनी ही माहिती दिली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी...

ऋषभ पंतची मर्सिडीज ज्या ठिकाणी उलटली तो ‘ब्लॅक स्पॉट’:येथे दर महिन्याला होतात 7 ते 8 अपघात

​​​​क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या कारला NH 58 राष्ट्रीय महामार्गावर (दिल्ली-हरिद्वार) रुडकीजवळ अपघात झाला. ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी 50 मीटरपर्यंतचा रस्ता खचलेला आहे. खड्डे आहेत, गिट्टी विखुरलेली आहे. प्रशासनाने ही जागा ब्लॅक स्पॉट म्हणून घोषित केली आहे. मात्र, अपघात होण्यापूर्वी या ठिकाणी धोक्याचा इशारा देणारा फलक लावण्यात अलेला नव्हता. आता अपघातानंतर प्रशासनाने येथे फलक लावला आहे. घटनास्थळी मोजणी करण्यासाठी रस्ते वाहतूक विभागाचे अधिकारीही पोहोचले आहेत. आज दिल्ली आणि डेहराडूनचे काही अधिकारीही तपासासाठी येथे पोहोचले आहेत. येथे वाचा संपूर्ण बातमी...

डुलकी लागल्याने ऋषभ पंतचा कार अपघात:लोक वाचवायला आले तेव्हा म्हणाला- मी ऋषभ पंत आहे; BCCI ने म्हटले - कपाळ, गुडघा आणि मनगटात दुखापत

25 वर्षीय क्रिकेटपटू ऋषभ पंत शुक्रवारी सकाळी एका रस्ता अपघातात थोडक्यात बचावला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झोपेमुळे हा अपघात झाला. त्याची मर्सिडीज नियंत्रणाबाहेर जाऊन दुभाजकाला धडकली, त्यानंतर तिला आग लागली आणि ती उलटली. अपघातानंतर खिडकी तोडून पंत जळत्या कारमधून बाहेर पडला. त्याच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी...

बातम्या आणखी आहेत...