आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Rishabh Pant; India Vs England 1st Test Live Cricket Score Update Feb 9| IND VS ENG Today Match Day 5 Latest News And Update Shubman Gill

टीम इंडियाचा 227 धावांनी पराभव:चेन्नईत 22 वर्षांनंतर भारताचा पराभव, इंग्लंडचा भारतीय मैदानावर आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय

चेन्नईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • चेन्नईमध्ये इंग्लंडचा सर्वात मोठा विजय

इंग्लंडने चेन्नई टेस्ट सामन्यात भारताला 227 धावांनी पराभूत केले. भारतीय मैदानावर धावांच्या बाबतीत इंग्लंडचा हा सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी इंग्लंडने 2006 मध्ये मुंबईत भारताला 212 धावांनी पराभूत केले होते. मराठीत स्कोअर कोर्ड पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

टीम इंडियाचा चेन्नईच्या चेपक स्टेडियममध्ये 22 वर्षानंतर कसोटीमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारताला याच स्टेडियमवर 1999 मध्ये पाकिस्तानने पराभूत केले होते. यानंतर येथे भारती संघाने आठ कसोटी सामने खेळले असून, त्यातील पाच सामन्यात विजय आणि तीन सामने ड्रॉ राहिले आहेत.

420 धावांचे टार्गेट चेज करताना भारताने काढले 192 रन

इंग्लंडने पहिल्या इनिंगमध्ये 578 आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 178 धावा केल्या. तर, टीम इंडियाने पहिल्या इनिंगमध्ये 337 धावा केल्या. त्यामुळे, टीम इंडियाला विजयासाठी 420 धावांची आवश्यकता होती. पण, भारतीय संघ अवघ्या 192 धावांवर ऑलआउट झाला.

चेन्नईमध्ये इंग्लंडचा सर्वात मोठा विजय

इंग्लंडने धावांच्या बाबतीत चेन्नईमध्ये सर्वात मोठा विजय मिळवला आहे. यापुर्वी 1934 मध्ये टीम इंडियाला 202 धावांनी पराभूत केले होते. यानंतर इंग्लिश टीमने चेन्नईमध्ये 1977 मध्ये झालेल्या कसोटीत भारताचा 200 धावांनी पराभव केला होता.

दुसऱ्या इनिंगमध्ये भारताची खराब सुरुवात

420 रनांचे टार्गेट चेज करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला 25 धावांवर पहिला झटका बसला. ओपनर रोहित शर्मा 12 धावांवर आउट झाला. यानंतर 117 धावांपर्यंत भारताचे 6 फलंदाज माघारी परतले होते. चेतेश्वर पुजारा (15 रन), शुभमन गिल (50 रन) आणि ऋषभ पंत (11 रन) धावांवर आउट झाले. तर, अजिंक्य रहाणे आणि वॉशिंग्टन सुंदर एकही धाव काढू शकले नाही. यानंतर कर्णधार विराट कोहली (72) ने रविचंद्रन अश्विनसोबत मिळून 7 व्या विकेटसाठी 105 बॉलवर 54 धावांची भागीदारी केली. पण, अश्विन आणि कोहली आउट केले.

जॅक लीचने भारताला 4 झटके दिले

स्पिनर जॅक लीचने भारतीय टीमचे 4 खेळाडू आउट केले. यात रविचंद्रन अश्विन (9),रोहित शर्मा (12 रन), चेतेश्वर पुजारा (15 रन) आणि शाहबाज नदीम(0) चा समावेश आहे.

भारतचे प्लेइंग-11: शुभमन गिल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, वॉशिंगटन सुंदर, शाहबाज नदीम, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा.

इंग्लंडचे प्लेइंग-11: डॉमनिक सिबली, रोरी बर्न्स, डेनियल लॉरेंस, जो रूट (कर्णधार), बेन स्टोक्स, ऑली पोप, जोस बटलर (विकेटकीपर), डॉम बेस, जैक लीच, जोफ्रा आर्चर, जेम्स एंडरसन.

बातम्या आणखी आहेत...