आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामालिकवीर फलंदाज ऋतुराज गायकवाडने (१०८) विजय हजारे ट्राॅफी क्रिकेट स्पर्धेत सलग तिसऱ्या शतकाची नाेंद केली. यादरम्यान त्याच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र संघ शुक्रवारी या स्पर्धेत उपविजेता ठरला. जॅकसनने (१३३) नाबाद शतकी खेळीतून साैराष्ट्र संघाला विजेतेपदाचा बहुमान मिळवून दिला. साैराष्ट्र संघाने अंतिम सामन्यात महाराष्ट्रावर ५ गड्यांनी मात केली. यासह साैराष्ट्र संघ पहिल्यांदा या स्पर्धेत किताबाचा मानकरी ठरला. पराभवामुळे महाराष्ट्र संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्र संघाने ९ बाद २४८ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात साैराष्ट्र संघाने ४६.३ षटकांत पाच गड्यांच्या माेबदल्यात विजयाचे लक्ष्य सहज गाठले. सलामीवीर हार्विक देसाई (५०) व शेल्डन जॅकसनने शतकी भागीदारीतून विजयाचा पाया रचला.
मालिकावीर ऋतुराजच्या ६६० धावा : ऋतुराज गायकवाडने यंदाची विजयी हजारे ट्राॅफी क्रिकेट स्पर्धा गाजवली. त्याने पाच सामन्यांत सर्वाधिक ६६० धावा काढल्या. यासह ताे मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. यादरम्यान त्याने तीन शतके आणि एक द्विशतकही साजरे केले. ताे बंगालविरुद्ध सामन्यात ४० धावांची खेळी करू शकला. उर्वरित चार सामन्यात ताे शतकवीर ठरला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.