आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशिया चषक:पाकिस्तानच्या रिझवानच्या पायाचे एमआरआय स्कॅन होणार

दुबई24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानला आशिया चषक स्पर्धेत भारताविरुद्धच्या सुपर-४ सामन्यात उजव्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्याचा एमआरआय स्कॅन करण्यात येणार आहे. पाकने हा सामना पाच विकेटने जिंकला.

अहवाल आल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. वृत्तानुसार,भारताच्या सामन्यात मोहम्मद हसनैनचा चेंडू रोखण्याच्या प्रयत्नात रिझवानचा पाय जमिनीवर जोरात आदळला. त्यामुळे त्याच्या पायावर ताण आला. ३० वर्षीय रिझवानला रविवारी पाकने अंतिम षटकात विजय मिळवल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...