आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Roads Become Open Museums In Qatar, Fear Of Lightning Leaves Residents On Their Way Abroad For A Month; 23 Thousand Indians Bought Tickets

फुटबॉल विश्वचषक:कतारमध्ये रस्ते बनले खुले म्युझियम, गाेंधळाच्या भीतीने रहिवासी महिनाभर परदेशाच्या मार्गावर

दोहा / सचिनकुमार25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कतारमध्ये अनेक नवीन रस्ते बांधण्यात आले आहेत. स्टेडियमकडे जाणाऱ्या रस्त्यांचे खुल्या संग्रहालयात रूपांतर करण्यात आले आहे. मेट्रोचा प्रवास मोफत करण्यात आला आहे. आठ स्टेडियम्स इतके जवळ आहेत की पायी जाता येते. एकाच दिवशी दोन सामने वेगवेगळ्या स्टेडियममध्ये पाहता येतील. २० नोव्हेंबर ते १८ डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेची तयारी पूर्ण झाल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला आहे. विमानतळ, स्थानिक बाजारपेठा, फुटपाथ आणि इतर सार्वजनिक ठिकाणी १०० हून अधिक कलाकृती ठेवण्यात आल्या आहेत.

विश्वचषक पाहण्यासाठी जगभरातून येथे येणाऱ्या क्रीडाप्रेमींचा अनुभव इतका रोमहर्षक व्हावा की, ते पुन्हा पर्यटक म्हणून येथे यावेत, अशी सरकारची इच्छा आहे. कतार म्युझियममधील सार्वजनिक कला संचालक अब्दुल रहमान अहमद अल इशाक म्हणतात की हे संग्रहालय २४ तास खुले असेल. प्रवेश शुल्कही नसेल. अमेरिकेचे टॉम ऑटर्नेस, फ्रान्सचे जीन मिशेल आणि इराकचे अहमद यांच्यासह अनेक देशांतील कलाकारांच्या कलाकृतीला येथे स्थान मिळाले आहे. फिफा विश्वचषक पाहण्यासाठी सुमारे १८ लाख चाहते कतारमध्ये येतील असा अंदाज आहे. भारताचा फुटबॉल संघ या स्पर्धेत सहभागी होणार नाही. असे असूनही, तिकीट विक्रीच्या पहिल्या टप्प्यात २३,५०० हून अधिक भारतीयांनी तिकिटे खरेदी केली आहेत. २०१८ मध्ये रशियात झालेल्या फुटबॉल वर्ल्ड कपमध्येही १८ हजार भारतीय पोहोचले होते. अमेरिका आणि चीनपाठाेपाठ तेथे सर्वाधिक भारतीय प्रेक्षक होते. २८ लाख लोकसंख्या असलेल्या कतारमध्ये आधीच ८ लाख भारतीय राहतात. त्यांना कमी दराने तिकिटेही उपलब्ध करून दिली जात आहेत. त्याचबरोबर सर्व यंत्रणा व आयाेजकांनी दावे करूनही येथे प्रेक्षकांच्या मुक्कामाची पुरेशी व्यवस्था झालेली नाही. हॉटेल्स पुरणार ​​नाहीत, बाकीचे मुक्काम कुठे करणार हा मोठा प्रश्न आहे. महिनाभर चालणाऱ्या या स्पर्धेदरम्यान अनेक स्थानिक लोक इतर देशांमध्ये जात आहेत. शाळा बंद असल्यामुळे मुलांना त्रास होईल, असे त्यांना वाटते. देशात गर्दी होईल आणि वाहतूक कोंडी ही मोठी समस्या बनेल. रेस्टॉरंट्स भरलेली असतील. इतर देशांतून येणारे लाखो लोक दारू पिऊन वातावरण खराब करतील. त्यामुळे इतक्या माेठ्या स्पर्धेचे आयाेजन येथे करायला नकाे हाेते, असे काही लोकांचे मत आहे.

भारतीय कलाकाराची युद्ध सोडून शांततेचा संदेश देणारी कलाकृती भारतातील सुबोध गुप्ता यांनी कलाकृतीत तीन पुरुषांचे चित्रण केले. एक देशावर हल्ला करणारा दहशतवादी आहे. दुसरा सैनिक, जो देशाला वाचवत आहे. तिसरा नागरिक आहे, जो युद्धामुळे त्रस्त आहे आणि युद्धामुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी त्याने मुखवटा घातला आहे. या कलाकृती महात्मा गांधींच्या तीन माकडांपासून प्रेरित आहेत.

बातम्या आणखी आहेत...