आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Robert Lewandowski, The Only Player To Score A Hat trick For Three Different Teams, Scored Three Goals On His Debut For Barcelona.

चॅम्पियन्स लीग:राॅबर्ट लेवानडाेस्की तीन वेगवेगळ्या संघांकडून हॅटट्रिक नाेंदवणारा एकमेव , बार्सिलाेना क्लबकडून पदार्पणातच तीन गाेल

बार्सिलाेना24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाेलंडच्या फुटबाॅलपटू राॅबर्ट लेवानडाेस्कीने बार्सिलाेनाकडून दमदार पदार्पण करताना चॅम्पियन्स लीगचा सामना गाजवला. त्याने सामन्यात चेक गणराज्यच्या व्हिक्टाेरिया प्लजेन क्लबविरुद्ध गाेलची हॅट््ट्रिक साजरी केली. लेवानडाेस्कीने (३४, ४५+३, ६७ वा मि.) शानदार गाेल करून बार्सिलाेना क्लबचा एकतर्फी विजय निश्चित केला. याच कामगिरीच्या बळावर बार्सिलाेना क्लबने लीगच्या सामन्यात व्हिक्टाेरियावर ५-१ ने मात केली. बार्सिलाेना क्लबच्या विजयासाठी फ्रेंक केसी (१३ वा मि.) आणि फेरान टाेरेसने (७१ वा मि.) प्रत्येकी एका गाेलचे माेलाचे याेगदान दिले. त्यामुळे या क्लबला माेठा विजय संपादन करता आला. आता राॅबर्ट लेवानडाेस्कीच्या नावे नव्या विक्रमाची नाेंद झाली. ताे तीन वेगवेगळ्या क्लबकडून गाेलची हॅट््ट्रिक करणारा जगातील एकमेव फुटबाॅलपटू ठरला. त्याने यापूर्वी जर्मन क्लब बाेरुसिया डाॅर्टमंड आणि बायर्न म्युनिच क्लबकडूनही अशा प्रकारची गाेलची हॅट््ट्रिक साजरी केली आहे. आता हाच कित्ता त्याने बार्सिलाेना क्लबकडून लीगमध्ये दिमाखदारपणे पदार्पण करताना गिरवला आहे. यासह त्याने या विक्रमात करीम बेंझेमाला मागे टाकले.

7 गाेल पूर्ण झाले लेवानडाेस्कीचे सत्रात ५ सामन्यांत. 6 वी हॅट््ट्रिक लेवानडाेस्कीची चॅम्पियन्स लीगमध्ये 32 गाेल पूर्ण लेवानडाेस्कीचे २० ग्रुप स्टेज सामन्यात

नेपाेलीची ४-१ ने लिव्हरपूलवर मात इटालियन क्लब नेपाेेलीने आपल्या घरच्या मैदानावर इंग्लिश क्लब लिव्हरपूलचा पराभव केला. या क्लबने सामन्यात ४-१ ने विजयाची नाेंद केली. त्यामुळे लिव्हरपूल क्लबला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. नेपाेली क्लबने मध्यंतरापूर्वीच ३-० ने आघाडी घेतली हाेती. यासह २०१४ नंतर पहिल्यांदाच क्लबने लिव्हरपूलविरुद्ध पहिल्या हाफमध्येच माेठी आघाडी घेतली. दुसरीकडे बायर्न म्युनिचने इटालियन क्लब इंटर मिलानचा पराभव केला.

बातम्या आणखी आहेत...