आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Roger Federer Is The Oldest Player To Reach The Wimbledon 2021 Quarterfinals

विम्बल्डन:39 वर्षीय राॅजर फेडरर उपांत्यपूर्व फेरी गाठणारा सर्वात वयस्कर

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्विसकिंग फेडरर आता १८ व्या वेळी अंतिम-८ मध्ये; अव्वल मानांकित बार्टी उपांत्य फेरीत दाखल

विम्बल्डनमधील सर्वात सुपरस्टार खेळाडू रॉजर फेडरर. तो जेव्हा कोर्टवर येतो, त्याचा खेळ पाहून उपस्थित चाहत्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतो. त्याचे फोरहँड, स्लाइड-बॅकहँड शॉट इतके अचूक असतात की, चाहते खेळ पाहताना मंत्रमुग्ध होतात. आपल्या याच क्षमतेच्या जोरावर स्विस टेनिसपटू फेडरर १८ व्या वेळी या ग्रास कोर्ट ग्रँडस्लॅमच्या उपांत्यपूर्व फेरीत पाेहोचला. ३९ वर्षे ३३३ दिवसांचा फेडरर याच ग्रँडस्लॅमच्या अंतिम-८ मध्ये पोहोचणारा (१९६८ नंतर) सर्वात वयस्क खेळाडू ठरला. पाऊस व वादळाच्या अडथळ्यात पार पडलेल्या उपउपांत्यपूर्व सामन्यात सहाव्या मानांकित फेडररने इटलीच्या लाॅरेंजो सोनेगोला ७-५, ६-४, ६-२ ने हरवले. पुढील महिन्यात ४० वर्षांचा होणारा फेडरर ५८ व्या वेळी ग्रँडस्लॅमच्या उपांत्यपूर्व फेरीत खेळेल. त्याचा हा स्पर्धेतील १०५ वा विजय ठरला. त्याने एका ग्रँडस्लॅममध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याच्या बाबतीत नदालशी (फ्रेंच ओपन १०५) बरोबरी साधाली. कॅनडाच्या फेलिक्स ऑगर एलियासिमेने प्री क्वाॅर्टर फायनलमध्ये चौथ्या मानांकित जर्मनीच्या अॅलेक्झांडर ज्वेरेवला ६-४, ७-६, ३-६, ६-४ ने पराभूत केले. महिला एकेरीत अव्वल मानांकित बार्टीने उपांत्य फेरी गाठली. तिने टाेमलानाेविकवर ६-१, ६-३ ने मात केली.

मेदवेदेवची १८२ मिनिटांची झंुज अपयशी
किताबाच्या प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या दुसऱ्या मानांकित डॅनियल मेदवेदेवला स्पर्धेतून पॅकअप करावे लागले. त्याचे पुुरुष एकेरीच्या गटातील आव्हान संपुष्टात आले. १४ व्या मानांकित हुरकाविचनने आक्रमक सर्व्हिस करताना मॅरेथाॅन लढतीत दुसऱ्या मानांकित मेदवेदेवला पराभूत करण्याचा पराक्रम गाजवला. त्याने तीन तास २ मिनिटे म्हणजेच १८२ मिनिटांच्या रंगतदार लढतीत २-६, ७-६, ३-६, ६-३, ६-३ ने सनसनाटी विजय संपादन केला.

प्लिस्काेवा उपांत्य फेरीमध्ये; गाेलुबिकवर २-० ने मात
आठव्या मानांकित कॅराेलिना प्लिस्काेवाने मंगळवारी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीमध्ये धडक मारली. यासाठी तिने उपांत्यपूर्व सामन्यात बिगरमानांकित गाेलुबिकचा पराभव केला. तिने ८१ मिनिटांत ६-२, ६-२ अशा फरकाने विजयाची नाेंद केली. यासह तिने स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले. दुसरीकडे दुसऱ्या मानांकित सबालेंकानेही महिला एकेरी गटाची उपांत्य फेरी गाठली. तिने सामन्यात २१ व्या मानांकित जाबेऊरला १ तास १४ मिनिटांत ६-४, ६-३ सरळ दाेन सेटमध्ये पराभूत केले.

स्पर्धेत केवळ तीन माजी चॅम्पियनचे आव्हान कायम
ग्रासकोर्ट ग्रँडस्लॅममध्ये केवळ तीन माजी चॅम्पियन खेळाडू बाकी आहेत. ८ वेळेचा चॅम्पियन फेडररचा उपांत्यपूर्व सामना होणे बाकी आहे. पाच वेळेचा माजी चॅम्पियन नोवाक योकोविक अंतिम-८ मध्ये हंगेरीच्या फुस्कोविसशी भिडेल. २०१८ ची विजेता जर्मनीच्या कर्बरचा सामना झेक गणराज्यच्या कॅरोलिना मुकोवाशी झाला. तिने या सामन्यात शानदार विजय संपादन केला. तिने १ तास १५ मिनिटे शर्थीची झुंज देताना ६-२, ६-३ ने एकतर्फी विजयाची नाेंद केली. त्यामुळे तिला स्पर्धेतील आपले आव्हान कायम ठेवता आले.

बातम्या आणखी आहेत...