आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Rohit Sharma's Name Recommended For Rajiv Gandhi Khel Ratna; Sachin, Dhoni And Kohli Have Won Awards Before

क्रिडा पुरस्कार:खेळरत्न पुरस्कारासाठी रोहित शर्माच्या नावाची शिफारस; याआधी सचिन, धोनी आणि कोहलीला मिळाला आहे पुरस्कार

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राजीव गांधी खेळरत्न अवॉर्डसाठी रेसलर विनेश फोगाट, टेबल टेनिस खेळाडू मनिका बत्रा यांचीही शिफारस

राजीव गांधी खेळरत्न अवॉर्डसाठी क्रिकेटर रोहित शर्माच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. रोहितशिवाय, महिला रेसलर विनेश फोगाट, टेबल टेनिस खेळाडून मनिका बत्रा आणि 2016 चा पॅरालंपिक गोल्ड मेडलिस्ट मरियप्पन थांगावेलुलाही या अवॉर्डसाठी नामांकन देण्या आले आहे.

रोहित शर्माआधी सचिन तेंडुलकर, महेंद्र सिंह धोनी आणि विराट कोहलीला हा पुरस्कार मिळाला आहे. सोमवारी द्रोणाचार्य आणि मेजर ध्यानचंद पुरस्कारासाठीही नावाची शिफारस करण्यात आली आहे.

दुसऱ्यांना 4 खेळाडूंना मिळणार खेळरत्न

खेळरत्न अवॉर्ड दुसऱ्यांना 4 खेळाडूंना दिला जाणार आहे. यापूर्वी 2016 मध्ये बॅडमिंटन खेळाडून पीवी सिंधु, जिमनास्ट दीपा कर्माकर, रेसलर साक्षी मलिक आणि शूटर जीतू रायला या पुरस्कारान सन्मानित करण्यात आले आहे. तसेच, 2009 मध्ये 3 बॉक्सर मॅरीकॉम, विजेंद्र सिंह आणि सुशील कुमारला पुरस्कार देण्यात आला होता.

खेळरत्नसाठी 42 अर्ज आले होते

कोरोनामुळे कारण पहिल्यांदा क्रिडा मंत्रालयाने ऑनलाइन अर्ज मागवले होते. यावर्षी राजीव गांधी खेळरत्नसाठी 42 अर्ज आले होते. अर्जुन अवॉर्डसाठी 215 खेळाडूंची नावे पाठवण्यात आली. या वर्षीसाठी अर्जुन अवॉर्ड आणि खेळरत्नसाठी जानेवारी 2016 ते डिसेंबर 2019 च्या कामगिरीवर विचार करण्यात आला आहे. बीसीसीआयने अर्जुन अवॉर्डसाठी ईशांत शर्मा आणि शिखर धवनची नावे पाठवली आहेत. महिला वर्गात बोर्डाने ऑलराउंडर दिप्ती शर्माचे नाव अर्जुन अवॉर्डसाठी पाठवले आहे.

बातम्या आणखी आहेत...