आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॅडमिंटन:प्रणय दुसऱ्या फेरीत; एन्गुसची दुखापतीने माघार

ओसाका3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताच्या एचएस प्रणयने मंगळवारी जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत धडक मारली. त्याने पाचव्यांदा हाँगकाँगच्या एन्गुस एनजीचा पराभव केला. प्रणयविरुद्ध सलामी सामन्यादरम्यान सातव्याच मिनिटाला एन्गुसने माघार घेतली. त्याला या सामन्यात गंभीर दुखापत झाली. यातून त्याने सामना अर्ध्यावर साेडण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान भारताच्या प्रणयने पहिल्या गेममध्ये ११-१० ने अाघाडी घेतली हाेती. त्याचा सामना आठव्या मानांकित लाेह िकनशी हाेणार आहे. भारताच्या अश्विनी भट व शिखा गाैतमला महिला दुहेरीच्या सलामी सामन्यात पराभवाला सामाेरे जावे लागले. भारताच्या तनीषा क्रेस्टाे आणि ईशान भटनागरने जागतिक क्रमवारीत पाच स्थानांनी माेठी प्रगती साधली. ही जाेडी जागतिक क्रमवारीत ३५ व्या स्थानावर आली आहे.

बातम्या आणखी आहेत...