आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Ronaldo Becomes The First Footballer To Score In A Record 5 World Cups As Portugal Beat Ghana 3 2

रोनाल्डो=रेकॉर्ड:5 विश्वचषकांत गाेल करणारा पहिला फुटबाॅलपटू ठरला, पाेर्तुगालची 3-2ने घानावर मात

दोहा6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गाेल करणारा ३७ वर्षीय राेनाल्डाे हा पाेर्तुगालचा सर्वात वयस्कर राेनाल्डाेच्या नावे विक्रमी ११८ वा आंतरराष्ट्रीय गाेल

क्रिस्टियानाे राेनाल्डाेने (६५ वा मि.) आपल्या विश्वविक्रमी गाेलच्या बळावर पाेर्तुगाल संघाला गुरुवारी फिफाच्या विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेत दणदणीत विजय मिळवून दिला. पाेर्तुगाल संघाने सामन्यात घानावर मात केली. पाेर्तुगाल संघाने ३-२ अशा फरकाने सामना जिंकला. संघाच्या विजयात जाेआओ (७८ वा मि.) आणि राफेल (८० वा मि.) यांनी प्रत्येकी एका गाेलचे याेगदान दिले. तसेच आफ्रिकन टीम घानाकडून अयेव (७३ वा मि .) आणि ओसमान बुकारी (८९ वा मि.) यांनी गाेल केले. क्रिस्टियानाे राेनाल्डाे हा पाचव्या विश्वचषकात गाेल करणारा जगातील पहिला फुटबाॅलपटू ठरला. त्याने यापुर्वी २००६, २०१०, २०१४, २०१८ आणि आता २०२२ मध्ये गाेल केले आहेत. आतापर्यंत लियाेनेल मेसी, क्लोज, पेले व यूव सीलर यांच्या नावे प्रत्येकी चार गाेलची नाेंद आहे. त्याने आपल्या नावे विक्रमी ११८ व्या आंतरराष्ट्रीय गाेलची नाेंद केली. तसेच पाेर्तुगाल संघासाठी गाेल करणारा राेनाल्डाे हा सर्वात वयस्कर फुटबाॅलपटू ठरला. त्याने वयाच्या ३७ व्या वर्षी हा पराक्रम गाजवला. घानाचाही विक्रम : घाना संघाने सामन्यात २ गाेल केले. मात्र, टीमचा पराभव झाला. तरीही घाना हा यंदा विश्वचषकात गाेल करणारा पहिला आफ्रिकन संघ ठरला.

बातम्या आणखी आहेत...