आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारताचा स्टार सायकलिस्ट रोनाल्डो सिंगने आशियाई ट्रॅक चॅम्पियनशिपमध्ये तिसरे पदक जिंकले. त्याने वरिष्ठ गटात स्प्रिंट प्रकारात करिअरमधील उत्कृष्ट कामगिरी करत रौप्यपदक आपल्या नावे केले. त्याचबरोबर महाराष्ट्रातील भंडाऱ्याच्या सुशिकला आगासे व मयुरी लुटे यांनी कांस्यपदक जिंकले आहे.
बुधवारी रोनाल्डोने जपानच्या अनुभवी रेसर केंतो यामासाकीला आव्हान दिले. यामासाकीने रोनाल्डोने हरवत प्रथम क्रमांक मिळवला. रोनाल्डोने म्हटले की, ‘हे माझे पहिले रौप्यपदक असून त्यावर मी समाधानी आहे. ही माझी करिअरमधील उत्कृष्ट कामगिरी आहे. प्रत्येक स्पर्धेत आपल्या तांत्रिक गोष्टी सुधारणा करतोय.’ भारताने २ सुवर्ण, ६ रौप्य व १५ कांस्य अशा एकूण २३ पदकांसह स्पर्धेत पाचव्या क्रमांकावर अभियान संपवले. जपान १८ सुवर्णांसह एकूण २७ पदके जिंकून अव्वलस्थान गाठले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.