आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासलामीच्या पराभवातून सावरलेल्या काेलकाता नाइट रायडर्स संघासमाेर आता एेतिहासिक ईडन गार्डन मैदानावर डुप्लेसिसच्या राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे विराट आव्हान असणार आहे. नितीश राणाच्या नेतृत्वात काेलकाता आणि डुप्लेसिसच्या नेतृत्वात बंगळुरू संघ गुरुवारी आयपीएलच्या सामन्यात समाेरासमाेर असणार आहे. काेहलीच्या विराट खेळीमुळे बंगळुरू संघाने यंदा शानदार विजयी सलामी दिली. याच विजयाने आत्मविश्वास दुणावलेला बंगळुरू संघ सलग दुसरा सामना जिंकण्यासाठी उत्सुक आहे.
नेतृत्वाच्या अनुभवाचा अभाव असलेल्या राणाच्या काेलकाता संघाला सलामीला पराभवाचा सामना करावा लागला. पंजाब संघाने गत सामन्यात काेलकाता टीमचा पराभव केला. त्यामुळे काेलकाता संघ घरच्या मैदानावर विजयी ट्रॅकवर येण्यासाठी उत्सुक आहे. काेलकाता संघाने आता यंदाच्या सत्रासाठी इंग्लंडच्या जेसन राॅयला २.८ काेटी रुपयांत आपल्यासाेबत करारबद्ध केले. सध्या संघाचा श्रेयस अय्यर आणि आता शाकिबही बाहेर आहे. यामुळे काेलकाता संघाने दर्जेदार फलंदाजाची उणीव दूर करण्यासाठी हा निर्णय घेतला. यासाठी टीमने २ काेटी रुपये माेजले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.