आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Royal Challengers Bangalore Vs Mumbai Indians IPL Latest News And Updates Today, 28 Sept

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

MI vs RCB:रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा सुपर ओव्हरमध्ये विजय; मुंबई इंडियंसने दिले होते 8 रनांचे टार्गेट

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबईने अखेरच्या 5 ओव्हरमधये केल्या 89 धावा

आयपीएलच्या 13 व्या सीजनचा आज 10वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) आणि मुंबई इंडियंसदरम्यान दुबईत सुरू आहे. या सीजनमध्ये पहिल्यांदाच दोन्ही संघ समोरा-समोर आले होते. बंगळुरूने मुंबईला 202 रनांचे टार्गेट दिले आहे. मुंबईने हे टार्गेट चेज केले आणि सामना टाय झाला. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये मुंबईने बंगळुरुला 8 रनांचे टार्गेट दिले होते. बंगळुरूकडून कोहली आणि डिविलियर्सने हे टार्गेट गाठले आणि सामना आपल्या खिशात घातला. लाइव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

रोहित नव्या विक्रमाच्या उंबरठ्यावर

मुंबई इंडियंसचा कर्णधार रोहित शर्मा आयपीएलमध्ये 5,000 धावांचा टप्पा गाठण्यापासून फक्त 2 रन दूर आहे. आजच्या सामन्यात रोहितने फक्त 8 धावा केल्या. रोहितने आयपीएल करिअरमध्ये 190 सामन्यात 31.78 च्या सरासरीने 4,990 रन केले आहेत. आतापर्यंत फक्त दोन फलंदाजांनी हा विक्रम केला आहे. पहिला म्हणजे विराट कोहली. कोहलीने आयपीएलमध्ये 178 सामन्यात 37.68 च्या सरासरीने 5,426 रन केले आहेत. त्यानंतर सुरेश रैनाने 193 सामन्यात 33.34 च्या सरासरीने 5,368 धावा केल्या आहेत.

मुंबईच्या नावे सर्वात जास्त 4 ट्रॉफी

आयपीएल इतिहासात मुंबईने सर्वात जास्त 4 वेळा (2019, 2017, 2015, 2013)आयपीएल किताब जिंकला आहे. मागच्या वेळेस मुंबईने चेन्नईचा 1 धावाने पराभव केला होता. तसेच, बंगळुरूने आतापर्यंत 3 वेळा फायनल (2009, 2011, 16) खेळला आहे, पण एकदाही किताब जिंकू शकले नाही.

बातम्या आणखी आहेत...