आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • RR Vs CSK, Head To Head Records In IPL 2020; Playing 11, Squad, Pitch Report Details And Updates

CSK vs RR:राजस्थान रॉयल्सचा चेन्नई सुपरकिंग्सवर 16 धावांनी विजय; राजस्थानने चेन्नईला दिले होते 217 रनांचे टार्गेट

दुबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सॅमसनची स्मिथसोबत दुसऱ्या विकेटसाठी 100+ रनांची पार्टनरशिप

आयपीएलच्या 13 व्या सीजनचा चौथा मॅच चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) आणि राजस्थान रॉयल्स (आरआर) दरम्यान आज शारजाहमध्ये खेळवला जात आहे. चेन्नईने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. राजस्थानने चेन्नईला 217 रनांचे टार्गेट दिले होते. हे लक्ष गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या चेन्नईला फक्त 200 धावांची मजल मारता आली. लाइव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

दोन्ही संघ

चेन्नई: महेंद्र सिंह धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), मुरली विजय, शेन वॉटसन, फाफ डु प्लेसिस, केदार जाधव, रितुराज गायकवाड़, रविंद्र जडेजा, सैम करन, दीपक चाहर, पीयूष चावला आणि लुंगी एनगिडी.

राजस्थान: स्टीव स्मिथ (कर्णधार), यशस्वी जायसवाल, रॉबिन उथप्पा, संजू सैमसन, डेविड मिलर, रेयान पराग, श्रेयश गोपाल, टॉम करन, राहुल तेवतिया, जोफ्रा आर्चर आणि जयदेव उनादकट.

कुटुंबासह यूएईत दाखल झालेला बटलर क्वारंटाइनमध्ये

दरम्यान राजस्थान रॉयल्समधील की-प्लेअर इंग्लँडचा बेन स्टोक्स आणि जोस बटलर पहिल्या सामन्याला मुकनार आहेत. बटलर बायो-सिक्योर वातावरणाशिवाय आपल्या कुटुंबासोबत यूएईत दाखल झाला होता. त्यामुळे त्याला 6 दिवस क्वारंटाइन राहावे लागेल. तर, स्टोक्सच्या वडिलांना ब्रेन कँसर असल्यामुळे त्यांच्या उपचारासाठी सध्या तो क्राइस्टचर्चमध्ये आहे.

दोन्ही संघातील महाग खेळाडू

सीएसकेचा कर्णधार धोनी सर्वात महाग खेळाडू आहे. संघान धोनीवर 15 कोटींची बोली लावली आहे. त्यानंतर केदार जाधवचे नाव आहे, ज्याला या सीजनमध्ये 7.80 कोटी रुपये मिळाले आहेत. तर, राजस्थानमध्ये स्मिथ 12.50 कोटी आणि संजू सॅमसन 8 कोटींसह सर्वात महाग खेळाडू आहेत.

रितुराजने कोरोनावर मात केली

चेन्नईच्या रितुराज गायकवाडने कोरोनावर मात केली आहे. रिजुराजची तिसरी रिपोर्ट निगेटीव्ह आली. सध्या रितुराज ट्रेनिंग करत आहे. टुर्नामेंटपूर्वीच चेन्नईच्या रितुराज आणि दीपक चाहरसह 13 जणांना कोरोनाची लागण झाली होती. रिजुराजव्यतिरीक्त सर्वजण ठीक झाले होते. दीपक चाहरने पहिला सामनाही खेळला आहे.

रॉयल्स टीममध्ये स्मिथ, उथप्पा आणि आर्चर की-प्लेअर्स

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार स्मिथसोबतच रॉबिन उथप्पा, संजू सॅमसन महत्वाचे फलंदाज आहेत. ऑलराउंडर्समध्ये टॉम करन आणि श्रेयस गोपाल राहतील. याशिवाय बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये इंग्लँडच्या वर्ल्ड कप टीममधील जोफ्रा आर्चरसोबत जयदेव उनादकट आणि वरुण आरोन मोठे खेळाडू आहेत.

हेड-टु-हेड

दोन्ही संघात आतापर्यंत 22 सामने झाले. यातील चेन्नईने 14 आणि राजस्थानने 8 सामने जिंकले. यूएईत दोन्ही संघात एकच सामना झाला होता. 23 एप्रिल 2014 ला झालेल्या सामन्यात सीएसके 7 धावांनी विजयी झाला होता.