आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आयपीएलच्या 13व्या सीजनचा 12वा सामना कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) आणि राजस्थान रॉयल्सदरम्यान दुबईमध्ये झाला. राजस्थानने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. राजस्थानला कोलकाताने 175 रनांचे टार्गेट दिले होते. हा सामना कोलकाताने आपल्या खिशात घातला. राजस्थानची सामन्यात विजयाची हॅट्रीक मारम्याची संधी हुकली. लाइव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा...
दोन्ही संघात कोणतेच बदल करण्यात आले नव्हते. राजस्थानमध्ये जोस बटलर, स्टीव स्मिथ, जोफ्रा आर्चर आणि टॉम करन परदेशी खेळाडू आहेत. तर, कोलकातामध्ये सुनील नरेन, इयोन मोर्गन, आंद्रे रसेल आणि पॅट कमिंस आहेत.
कमिंसकडे 100 विकेट्स घेण्याची संधी
लीगमधील सर्वात महाग खेळाडू केकेआरच्या पॅट कमिंसकडे ओव्हरऑल टी-20 क्रिकेटमध्ये 100 विकेट्स पूर्ण करण्याची संधी आहे. कमिंस आपल्या 100 विकेट्स घेण्यापासून फक्त दोन विकेट्स दूर आहे. यापूर्वी राजस्थानने आपल्या मागील सामन्यात लीगचे सर्वात मोठे टार्गेट चेज केले होते.
दोन्ही संघ
कोलकाता: शुभमन गिल, सुनील नरेन, नीतीश राणा, दिनेश कार्तिक (कर्णधार आणि विकेटकीपर), इयोन मोर्गन, आंद्रे रसेल, पैट कमिंस, शिवम मावी, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती आणि कमलेश नागरकोटी.
राजस्थान: जोस बटलर (विकेटकीपर), स्टीव स्मिथ (कर्णधार), संजू सैमसन, राहुल तेवतिया, रॉबिन उथप्पा, रियान पराग, जोफ्रा आर्चर, टॉम करन, श्रेयस गोपाल, अंकित राजपूत आणि जयदेव उनादकट.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.