आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • RR Vs KXIP Today IPL Match | Rajasthan Royals Vs Kings XI Punjab Match 7 Live Cricket Score Latest Updates

RR vs KXIP:राजस्थान राॅयल्स संघाचा किंग्ज इलेव्हन पंजाब टीमवर 4 गड्यांनी विजय, राजस्थान राॅयल्स गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी

शारजाहएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कर्णधार स्मिथ (५०), सामनावीर संजू सॅमसन (८५) आणि युवा फलंदाज राहुल तेवाटियाच्या (५३) झंझावाती खेळीच्या बळावर राजस्थान राॅयल्स संघाने रविवारी आयपीएलमध्ये राेमहर्षक विजय संपादन केला. राजस्थान संघाने लीगमधील आपल्या दुसऱ्या सामन्यात लाेकेश राहुलच्या किंग्ज इलेव्हन पंजाबवर ४ गड्यांनी मात केली. यासह राजस्थान संघाने सलग दुसरा सामना जिंकून लीगच्या गुणतालिकेमध्ये दुसऱ्या स्थानावर धडक मारली. आता टीमचे दाेन सामन्यांत चार गुण झाले आहेत.

लाेकेश राहुल (६९) आणि मयंक अग्रवाल (१०६) यांच्या खेळीतून किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने प्रथम फलंदाजी करताना २ बाद २२३ धावा काढल्या. प्रत्युत्तरामध्ये राजस्थान संघाने ६ गड्यांच्या माेबदल्यात १९.३ षटकांत चित्तथरारक विजय साकारला.

संजु सॅमसनचे सलग दुसरे अर्धशतक; तेवाटियाने दिली कलाटणी
राजस्थान राॅयल्सच्या विजयात संजु सॅमसन आणि राहुल तेवाटियाचे माेलाचे याेगदान राहिले. सॅमसनने सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक साजरे केले. त्याने आता ८५ धावांची खेळी केली. स्मिथने ५० धावांची खेळी करून विजयाचा मार्ग सुकर केला. त्यानंतर हरियाणाच्या २७ वर्षीय राहुल तेवाटियाने ७ उत्तंुग षटकार ठाेकून सामन्याला कलाटणी दिली. त्यानंतर टाॅम करेनने विजयी चाैकार मारून पंजाबवर मात केली.

दोन्ही संघ

राजस्थान: जोस बटलर, स्टीव स्मिथ (कर्णधार), संजू सैमसन (विकेटकीपर), रॉबिन उथप्पा, राहुल तेवतिया, रियान पराग, टॉम करन, जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाल, जयदेव उनादकट आणि अंकित राजपूत.

पंजाब: मयंक अग्रवाल, लोकेश राहुल (कर्णधार आणि विकेटकीपर), निकोलस पूरन, ग्लेन मॅक्सवेल, करुन नायर, सरफराज खान, जिमी नीशम, मुरुगन अश्विन, रवि बिश्नोई, मोहम्मद शमी आणि शेल्डन कॉटरेल.

लीगमध्ये सर्वाधिक स्कोर बनवणारा राहुल

बंगळुरूविरुद्ध मागच्या मॅचमध्ये राहुलने 132 धावा केल्या होत्या. हा लीगमध्ये भारतीय खेळाडूकडून झालेला आतापर्यंतचा सर्वाधिक स्रोअर आहे. यापूर्वी ऋषभ पंतने 128 धावा केल्या आहेत. परंतू, 175 धावांसह क्रिस गेल टॉपवर आहे.

दोन्ही संघातील महाग खेळाडू

राजस्थानमध्ये कर्णधार स्मिथ 12.50 कोटी आणि संजू सॅमसन 8 कोटींसह सर्वात महाग खेळाडू आहेत. तर, पंजाबमध्ये कर्णधार लोकेश राहुल 11 कोटी आणि ग्लेन मॅक्सवेल 10.75 कोटींसह टॉपवर आहेत.