आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Rule Of 25%; Sports Federations Appoint Only 9 Percent Of Players, Baichung Bhutia Demands Voting Rights For Players

मागणी:नियम 25 %चा; क्रीडा महासंघांवर फक्त 9 टक्के खेळाडूंची नियुक्ती, खेळाडूंना मतदान हक्काची बाइचुंग भुतियाची मागणी

जसविंदर सिद्धू | नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आंतरराष्ट्रीय आणि पदकविजेत्या खेळाडूंचाही आता देशातील विविध खेळांच्या फेडरेशनवरील सहभाग वाढवण्यासाठी क्रीडा मंत्रालयाने पुढाकार घेतला. मात्र, याच माेहिमेला आता माेठा धक्का बसला आहे. कारण, फक्त ९ टक्के खेळाडूच फेडरेशनवर आहेत. नियमानुसार फेडरेशनवर जवळपास २५ टक्के खेळाडूंच्या सहभागाची सक्ती आहे. मात्र, प्रत्यक्षात याच खेळाडूंना खाे दिला जात आहे. सध्या क्रीडा मंत्रालयाच्या वतीने देशभरातील ६१ खेळांच्या संघटनांना मंजुरी देण्यात आलेली आहे. यामध्ये संघटनांच्या खेळाचा ऑलिम्पिकमध्ये समावेश आहे. आता क्रीडा मंत्रालय लवकरच देशात स्पार्ट्््स काेड लागू करण्याच्या तयारीत आहे. यातील नियमानुसारच सर्व काही प्रशासनाची कार्यपद्धती चालणार आहे. यातून प्रत्यक्षात खेळाडूंचा संघटनेतील सहभाग वाढण्यास मदत हाेणार आहे.

यादरम्यान भारतीय फुटबाॅल संघाचा माजी कर्णधार भुतियाने खेळाडूंनाही फेडरेशनच्या निवडणुकीदरम्यान मतदान करण्याचा अधिकाराची मागणी केली. मात्र, ही मागणी फिफाने फेटाळली.

अ‍ॅथलेटिक्स, नेमबाजीचे नेतृत्व खेळाडूकडे; इतर ४७ % अध्यक्ष राजकीय पुढारी
देशामध्ये ४७ टक्के क्रीडा फेडरेशनच्या नेतृत्वाची धुरा राजकीय पुढाऱ्यांकडे साेपवण्यात आली आहे. फक्त अॅथलेटिक्स आणि नेमबाजी संघटनेच्या अध्यक्षपदी खेळाडूंची निवड झालेली आहे. यामध्ये १०० मीटरचे धावपटू आदिल सुमारीवाला हे अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष आहेत. तसेच फेडरेशनच्या २७ सदस्यीय कार्यकारी समितीमध्ये अंजू बाॅबी जाॅर्ज, बहादूरसिंग, सिकंदर आणि सी. लताचाही समावेश आहे.

उर्वरित इतर सर्वच खेळांच्या संघटनांवर राजकीय पुढारी आणि मंत्र्यांचा समावेश आहे. बॅडमिंटन महासंघाच्या अध्यक्षपदी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा आहेत. याच्या कार्यकारी समितीमध्ये एकमेव गाेपीचंदचा समावेश आहे. नेमबाजी संघटनेच्या अध्यक्षपदी माजी नेमबाज रनिंदरसिंग आहेत. ते माजी आंतरराष्ट्रीय नेमबाज आहेत.

प्रसिद्ध खेळाडूंचा अभाव; फेडरेशनवर पाठवण्याची अडचण
नियमानुसार लाेकप्रिय खेळाडूंना फेडरेशनमध्ये सहभागी केले जाऊ शकते. मात्र, भारतामध्ये अशा प्रकारच्या खेळाडूंचाच अभाव आहे. त्यामुळेच राजकीय पुढाऱ्यांचा या संघटनेतील सहभाग वाढत आहे. बहुताश संघटनांचे खेळाडू ऑलिम्पिक आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सहभागी हाेतात, अशी प्रतिक्रिया स्पाेर्ट््स फेडरेशनच्या अध्यक्षांनी दिली आहे. फिफाने खेळाडूंना फेडरेशनचे प्रतिनिधित्व करण्याचा सल्ला दिला. यातून त्यांना अडचणीवर मात करता येईल. याशिवाय वैयक्तिक मतदानाचा वापरही याेग्य पद्धतीने व्हावा, असेही फिफाने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...