आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

लॉकडाऊनमुळे खेळाडूवर संकट:धावपटू दुती चंद कार विकून करणार ऑलिम्पिक स्पर्धेची तयारी

शेखर झा | रायपूर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऑलिम्पिक स्थगित; 30 लाखांची कार 20 लाखांत विकणार
Advertisement
Advertisement

काेराेनाच्या संकटामुळे टाेकियो ऑलिम्पिक स्पर्धेला वर्षभरासाठी स्थगिती देण्यात आली. मात्र, हाच निर्णय अनेक खेळाडूंसाठी अडचणीचा ठरला आहे. कारण, यामुळे खेळाडूंना तयारीसाठी अनेक आर्थिक अडचणींना सामाेरे जावे लागत आहे. यामध्येच भारताची आंतरराष्ट्रीय महिला धावपटू दुती चंदचा समावेश आहे. तिला आता ऑलिम्पिक स्पर्धेच्या तयारीसाठी स्वत:ची कार विकावी लागणार आहे. ही कार विकून येणाऱ्या पैशातून आपण ऑलिम्पिकची तयारी करणार असल्याचे तिने सांगितले. सध्या लाॅकडाऊनमुळे ती कलिंगामध्ये सराव करते.

सध्या आर्थिक अडचणींना सामाेरे जावे लागत आहे. त्यामुळे आता माझ्यावर लग्झरी कार बीएमडब्ल्यू विकण्याचा प्रसंग ओढवला. ही ३० लाख किमतीची कार आता २० लाखांत विकण्यास मी तयार आहे. यातून येणाऱ्या पैशांच्या आधारे मला ऑलिम्पिकची परिपूर्ण अशी तयारी करता येईल. त्यासाठीच मला हा निर्णय घ्यावा लागला, अशी प्रतिक्रिया दुतीने दिली. सध्या तिने कलिंगा स्टेडियममध्ये तीन सदस्यीय टीमसाेबत आपला सराव सुरू केला आहे. स्थगितीमुळे खेळाडूंना सरावाला संधी मिळाली आहे.

पुढच्या वर्षी हाेणाऱ्या टाेकियाे ऑलिम्पिक स्पर्धेत दुती चंद ही भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. या स्पर्धेमध्ये आता अव्वल कामगिरीचा मानस दुतीने व्यक्त केला.

Advertisement
0