आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Rupal World U 20 Athletics Championship Final: Completed 400 Meters In 52.77 Seconds, Running At 27 Kmph

रुपल वर्ल्ड U-20 ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत:400 मीटरची शर्यत 52.77 सेकंदात केली पूर्ण, ताशी 27 किमी वेगाने धावली

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेदरम्यान कोलंबियामधून आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. तिकडे भारतीय धावपटू रुपल चौधरीने महिलांच्या 400 मीटर शर्यतीत अंतिम फेरी गाठली आहे. आता ती शुक्रवारी पदकासाठी जोर लावणार आहे. रुपलने अवघ्या एका दिवसापूर्वीच रौप्यपदक जिंकले आहे.

बुधवारी रात्री झालेल्या या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मेरठच्या रुपलने 400 मीटरची शर्यत अवघ्या 52.77 सेकंदात पूर्ण केली. ही तिची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी आहे. तिने एकंदरीत दुसरे स्थान पटकावले. या शर्यतीत रुपल ताशी 27 किलोमीटर वेगाने धावली. आणखी एक भारतीय धावपटू प्रिया मोहन ही मात्र 10 व्या क्रमांकावर राहिली त्यामुळे ती अंतिम फेरीत प्रवेश करू शकली नाही.

पूर्वी रुपलचे घरचे लोक तिला खेळात जाण्यापासून रोखायचे. पण धावण्यासाठी जिद्द पकडून बसलेल्या रुपलने आधी वडिलांचे मन वळवले. मग हळूहळू संपूर्ण कुटुंबाची तिला साथ मिळू लागली. तिच्या जिद्दीनेच तिला आज जागतिक स्पर्धेत पदक मिळवून दिले. ती राष्ट्रीय चॅम्पियनही आहे.

ही चॅम्पियनशिप ज्युनिअर खेळाडूंसाठी सर्वात मोठे व्यासपीठ आहे. येथून, भविष्यातील तारे काढले जातात. नीरज चोप्रा, हिमा दास सारखे स्टार्स येथूनच पुढे आले आहेत.

रूपल चौधरीचे वैयक्तिक सर्वोत्तम 52.77 सेकंद.
रूपल चौधरीचे वैयक्तिक सर्वोत्तम 52.77 सेकंद.

रिले संघाने जिंकले रौप्यपदक

दोन दिवसांपूर्वी भारतीय मिश्र रिले संघाने जागतिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकून इतिहास रचला. रुपलचाही या संघात समावेश होता. तिच्यासोबत भारत श्रीधर, प्रिया मोहन, कपिल यांचा संघात समावेश होता. भारतीय संघाने 3:17:76 मिनिटांची वेळ नोंदवली. तर अमेरिकेच्या संघाने 3:17:69 मिनिटे पूर्ण करून सुवर्णपदक पटकावले. यात जमैकाने (3:19:96 मि.) कांस्यपदक जिंकले.

उपांत्य फेरीत दुसऱ्या क्रमांकावर राहिल्यानंतर त्याने अंतिम फेरीत धडक मारली.
उपांत्य फेरीत दुसऱ्या क्रमांकावर राहिल्यानंतर त्याने अंतिम फेरीत धडक मारली.

नीरजने जिंकले होते सुवर्ण

नीरज चोप्राने जागतिक ज्युनियर अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये देशातील पहिले सुवर्ण जिंकले. त्याच्यानंतर, आसामची धावपटू हिमा दासने 2018 मध्ये चॅम्पियनशिपच्या सुवर्णपदक विजेत्यांमध्ये आपले नाव जोडले.

हिमाने 400 मीटरमध्ये 51.46 सेकंदाची वेळ नोंदवत सुवर्ण पदक जिंकले होते. जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप, ज्युनियर किंवा वरिष्ठ अशा कोणत्याही ट्रॅक आणि फील्ड स्पर्धेत पदक जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली. त्या सुवर्णपदकाने हिमाला स्टार बनवले. त्यानंतर हिमाने मागे वळून पाहिले नाही.

बातम्या आणखी आहेत...