आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मियामी ओपन टेनिस:रशियन टेनिसपटू मेदवेदेवने पटकावला पहिल्यांदा मियामी ओपनचा किताब

मियामी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशियन टेनिसपटू डॅनियल मेदवेदेव यंदाच्या सत्रातील मियामी ओपन टेनिस स्पर्धेत चॅम्पियन ठरला. त्याने पुरुष एकेरीचा किताब पटकावला. यासह ताे पहिल्यांदाच या स्पर्धेत विजेतेपदाचा मानकरी ठरला आहे. चाैथ्या मानांकित मेदवेदेवने फायनलमध्ये १० व्या मानांकित जेनिक सिनरचा पराभव केला. त्याने ९४ मिनिटांमध्ये ७-५, ६-४ अशा फरकाने सामना जिंकला. यासह त्याने यंदाच्या सत्रामध्ये चाैथ्यांदा चॅम्पियन हाेण्याचा बहुमान पटकावला. तसेच त्याने सलग सहावा विजय साजरा करत जेतेपदावर नाव काेरले. त्याने यंदाच्या सत्रात यापूर्वी दुबई ओपन आणि दाेहा ओपनमध्येही जेतेपदाचा बहुमान पटकावला. तसेच रशियाच्या या टेनिसपटूने आपल्या करिअरमध्ये पाचवा मास्टर्स १००० वा किताब जिंकला आहे. यासह २७ वर्षीय मेदवेदेव हा सलग पाचव्या एटीपीची फायनल गाठणारा १९८१ मधील इवान लेंडलनंतर पहिला टेनिसपटू ठरला.