आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडिन एल्गरच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिका संघाने पिछाडीवरून दमदार कमबॅक करत भारतीय संघाच्या स्वप्नाचा चक्काचुरा केला. सेंच्युरीयनचं मैदान मारल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचे मैदान सहज फत्तेह करुन आस भ्रमात राहिलेल्या टीम इंडियाला जोहन्सबर्ग आणि केपटाऊनमध्ये धूळ चारत आफ्रिकेने आपला गड सुरक्षित राखला. भारतीय संघाला आतापर्यंत एकदाही दक्षिण आफ्रिकेत मालिका जिंकता आलेली नाही. पहिला सामना जिंकून टीम इंडियाने सुरुवात दमदार केली खरी पण, मालिका जिंकण्याचे स्वप्न स्वप्नच राहिले आहे.
तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांनी घोर निराश केल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या डावात भारतीय संघाने 223 धावा केल्या. त्यानंतर आफ्रिकेचा पहिला डाव 210 डावात आटोपून त्यांनी सामना बरोबरीत आणला खरा. पण दुसऱ्या डावातही आघाडीच्या फलंदाजीने नांगी टाकली. रिषभ पंतच्या शतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने कशीबशी 198 धावांपर्यंत मजल मारली.
या धावांच्या आधारे टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेसमोर 212 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मार्करम 16, एल्गर 30 धावा करुन परतल्यानंतर भारतीय संघ सामन्यात पुन्हा कमबॅक करेल असे वाटले होते. पण कीगन पीटरसनने 82 धावांची खेळी करत भारतीय गोलंदाजांचे खांदे पाडले. शार्दुल ठाकूरने त्याची विकेट घेतली त्यावेळी सामना आफ्रिकेच्या बाजूने झुकला होता. रेस्सी व्हॅन डर दुसेन याने 95 चेंडूत नाबाद 42 तर तेम्बा बवुमाने 58 चेंडूत 32 धावांची खेळी करत संघाला 7 विकेट्सनी विजय मिळवून दिला.
भारताने पहिल्या डावात 223 धावा केल्या होत्या. उत्तरा दाखल टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी करत 13 धावांची आघाडी मिळून दिली होती. पण पहिल्या डावा प्रमाणे दुसऱ्या डावात देखील भारताचा डाव कोसळला. ऋषभ पंतने झळकावलेल्या नाबाद शतकामुळे भारताला 198 धावांपर्यंत मजल मारता आली.
सलामीवीर आणि मधळ्या फळीतील फलंदाजांच्या अपयशामुळे भारताला धावा करता आल्या नाहीत. यामुळेच कसोटीवर पकड असताना देखील भारताचा पराभव झाला. भारत गेल्या 30 वर्षापासून द.आफ्रिकेत कसोटी क्रिकेट खेळत आहेत. इतक्या वर्षात त्यांना कधीच कसोटी मालिका जिंकता आली नाही. यावेळी भारताला संधी होती. पण सलग दोन सामने गमवल्याने ती गमावली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.