आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउत्तर काश्मीरमधील बांदिपोरा जिल्ह्यातील सबकत मलिक या 20 वर्षीय मुलीची मार्शल आर्ट्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे. पुढील महिन्यात मंगोलिया येथे होणाऱ्या जागतिक जिउ-जित्सू चॅम्पियनशिपमध्ये राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तिची निवड झाली. सबकत मलिकने जम्मू-काश्मीरसाठी सुवर्णपदकही जिंकले आहे. पण हा येथपर्यंत पोहण्याचा तिचा प्रवास सोपा नव्हता.
सबकत मलिकने सांगितले की, जू-जित्सु या जपानी मार्शल आर्ट खेळाला आमच्या गावात कुस्ती म्हणतात आणि प्रत्येकाला वाटते की फक्त पुरुषच खेळू शकतात. पण मी लोकांचे टोमणे, मुलांचे शिवीगाळ ऐकलीय या खेळात नाव कमवण्यासाठी अनेक वर्षे गुपचूप भूमिगत सराव केला.
सहाव्या इयत्तेत टीव्हीवर जिउ-जित्सू स्पर्धा पाहून सबकत मलिकने ठरवले की ती मार्शल आर्ट्समध्ये करिअर करणार. ती म्हणाली की, शाळेत जेव्हा मी काही मुलींसोबत मैदानावर सराव करायला सुरुवात केली. तेव्हा शाळेच्या प्रशासनाने आमच्यावर निर्बंध घातले आणि शाळेचे वातावरण खराब होईल, असे सांगितले. मी गावातील मैदानात सराव केला. तेव्हा लोकांनी मला टोमणे मारले. तू मुलगी आहेस, स्वयंपाकघरातील काम शिक, हा निर्लज्ज खेळ खेळू नकोस, तू अश्लीलता पसरवत आहेस, असे ते मला म्हणायचे.
प्रशिक्षक मुझफ्फर अहमद यांच्या योगदानाबद्दल सबकत म्हणाली की, जेव्हा मला कुठेही सराव करण्याची परवानगी नव्हती. तेव्हा माझे प्रशिक्षक माझ्यासोबत डीसी कार्यालयात गेले. तेव्हा डीसी सरांनी शाळेच्या व्यवस्थापनाला मला सराव करण्यास परवानगी देण्याचे आदेश दिले. तरीही शाळेच्या मैदानात नव्हे. तर अंधाऱ्या खोलीत सराव करण्याची परवानगी मिळाली होती. सबकत तिचे प्रशिक्षक मुझफ्फर अहमद तसेच जम्मू आणि काश्मीर जू-जित्सू असोसिएशनचे अध्यक्ष तरसेम शर्मा यांचे आभार मानले. मला त्यांनी सर्व अडचणी असूनही प्रोत्साहन दिले, असे ती म्हणाले.
जू-जित्सू हा ज्युडो किंवा कराटे पेक्षा पूर्णपणे वेगळा आणि धोकादायक खेळ आहे. यामध्ये दोन खेळाडू एकमेकांवर ठोसे आणि लाथांनी हल्ला करतात. आता पुढील महिन्यात मॅग्नोलिया येथे होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तिची निवड झाल्यानंतर सबकत तिच्या जिल्ह्यात स्टार बनली आहे.
हवाई दलास महिला शक्तीचे पंख
हवाई दलाने ग्रुप कॅप्टन शलिजा धामी यांना पाकिस्तान सीमेवर तैनात लढाऊ युनिटचे नेतृत्व सोपवले आहे. १९३२ मध्ये स्थापन भारतीय हवाई दलाच्या ९० वर्षांच्या इतिहासात प्रथमच एखादी महिला कॉम्बॅट युनिटची कमांडर बनली आहे. धामी २००३ मध्ये हवाई दलात हेलिकॉप्टर पायलट म्हणून रुजू झाल्या. २,८०० तासांचा उड्डाणाचा अनुभव असलेल्या धामी कॉम्बॅट युनिटच्या सेकंड इन कमांड होत्या. येथे वाचा संपुर्ण बातमी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.