आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोना महामारीमुळे भारतात 10 महीने आणि 26 दिवसानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन झाले आहे. भारत-इंग्लंडदरम्यान चार टेस्टच्या सीरीजमधील पहिला सामना आज चेन्नईमध्ये होत आहे. या पार्श्वभूमीवर इंग्लंडविरोधात टेस्टमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या सचिन तेंडुलकरने आमच्याशी खास बातचीत केली आहे. वाचा, सचिन काय म्हणाला...
प्रश्न: 10 महीन्यानंतर देशात भारतीय संघाला घरच्या मैदानावर खेळताना पाहणे किती रंजक ठरेल?
उत्तर: भारतासाटी ही खूप चांगली बाब आहे की, देशात आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन झाले आहे. मी चांगल्या सामन्यांची आशा करत आहे. जेव्हा मी इतक्या मोठ्या गॅपनंतर क्रिकेट सुरू होण्याबाबत विचार करतो, तेव्हा मला 2008 ची आठवण येते. तेव्हा मुंबईत झालेल्या हल्यानंतर काही काळ क्रिकेट बंद झाले होते. जेव्हा त्यावेळेस क्रिकेटचे पुनरागमन झाले होते, तेव्हा पहिलाच सामना चेन्नईमध्ये इंग्लंडविरोधात होता. यंदाही इंग्लंडविरोधात चेन्नईमध्ये सामना आहे. मी देवाला प्रार्थना करतो की, यावेळेसही तेव्हासारखा रिजल्ट यावा. तेव्हा आम्ही चेन्नईत इंग्लंडला पराभूत केले होते.
प्रश्न: जर भारत-ऑस्ट्रेलिया किंवा भारत-पाकिस्तान क्रिकेट रायव्हलरीशी तुलना करायची झाल्यास, भारत-इंग्लंड रायव्हलरीला काय म्हणाल ?
उत्तर: प्रत्येक रायव्हलरीचे आपले एक महत्व आहे. फक्त आपल्याला हे विसरुन चालणार नाही की, आपण भारतासाठी खेळत आहोत. भारताचे नाव उंच व्हायला हवे. ज्याप्रकारे भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात उत्कृष्ट कामगिरी केली होती, त्याच प्रकारचा खेळ चेन्नईमध्ये दाखवण्याची गरज आहे.
प्रश्न: इंग्लंड एकमेव देश आहे, ज्याने मागील दशकात कसोटीमध्ये भारताला भारतात पराभूत केले आहे.यामुळे हे किती आव्हानात्मक असेल ?
उत्तर: प्रत्येक सीरिज वेगळी असते आणि त्याला वेगळ्या पद्धतीनेच ट्रीट करायला हवे. मागे काय झाले, यामुळे एकतर कॉन्फिडेंस मिळतो किंवा कमी होतो. सध्या दोन्ही संघांनी आपापल्या मागील सीरिजमध्ये विजय मिळवला आहे. भारताने ऑस्ट्रेलियाला हरवले आणि इंग्लंडने श्रीलंकेला हरवले. दोन्ही संघांचा आत्मविश्वास खूप मजबुत आहे.
प्रश्न: सचिन तुम्ही टेस्ट क्रिकेटमध्ये इंग्लंडविरोधात सर्वाधिक धावा केलेले खेळाडू आहात. इंग्लंडचा संघ भारतात यायचा, तेव्हा तुमच्यासाठी वेगळी रणनिती आखायचा. 2001-02 मध्ये नासिर हुसैनने तुमच्या विरोधात लेग साइड थ्योअरी ट्राय केली होती. यावेळेस विराट आणि रोहितविरोधत अशी थ्योअरी दिसेल ?
उत्तर: प्रत्येक संघ विरोधी संघातील चांगल्या फलंदाजांविरोधात वेगला प्लॅन आखतो. इंग्लंडचा संघही त्यांच्याकडून चांगली प्लॅनिंग करेल.
प्रश्नः या टेस्ट सिरीजमध्ये कोण वरचढ ठरतील? बॅट्समेन की स्पिनर्स? भारतीय वातावरणात फास्ट बोलर्स काही कमाल दाखवू शकतील का?
उत्तर: या सिरीजमध्ये बॅट्समेन आणि स्पिनर्स दोघेही डॉमिनेट करू शकतील. फास्ट बोलर्सबद्दल बोलावयाचे झाल्यास त्यांना रिव्हर्स स्विंग किती मिळेल यावरच सारे काही असेल. 15 ओव्हरपासून 55 ओव्हर पर्यंत रिव्हर्स स्विंग जास्त घातक असतात. 55-60 ओव्हर पासून 80 ओव्हर पर्यंत बॉल नरम पडतो. त्यामुळे, बॅट्समनला रिव्हर्स स्विंग मॅनेज करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळतो.
प्रश्न: मोटेरामध्ये होणारा तिसरा सामना डे-नाइट आहे. एडिलेड सामना सुद्धा डे-नाइट होता. या मॅचमध्ये उतरण्यापूर्वी भारतीय खेळाडूंच्या मनात 36 ऑलआउटची भिती राहील का?
उत्तर: डे-नाइट टेस्टमध्ये परिस्थितीचा फरक पडतो. लाइट्स ऑन झाल्यानंतर अनेकवेळा बॉल जास्त मूव्ह करते. संध्याकाळ झाल्यानंतर गवत थंड पडते, त्याचा सुद्धा परिणाम होतो. एडिलेडमध्ये डे-नाइट टेस्ट हारलो हे मान्य आहे. पण, त्यावेळी भारताबद्दल अनेक चांगल्या गोष्टी चांगल्या देखील ठरल्या. आपण ऑस्ट्रेलियाकडून टेस्ट मालिका जिंकली. मोटेरामध्ये टीम इंडिया डे-नाइट टेस्ट खेळायला उतरेल तेव्हा ही मॅच जिंकायची कशी यावरच टीम इंडियाचे लक्ष राहील. शेवटी मालिका चांगली व्हावी आणि उच्च दर्जाचे क्रिकेट पाहायला मिळावे हीच माझी इच्छा आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.