आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Saina, Srikkanth's Tokyo Olympics Hopes End Due To Singapore Open Cancels

सिंगापूर ओपन रद्द:सायना, श्रीकांतच्या टोकियो ऑलिम्पिकच्या आशा समाप्त

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मलेशियानंतर सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धा रद्द

कोरोनामुळे सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धा रद्द करण्यात आली. त्यामुळे भारताची स्टार खेळाडू सायना नेहवाल व किदांबी श्रीकांतची टोकियाे ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवण्याची आशा जवळपास समाप्त झाली. टोकियाे ऑलिम्पिकसाठी पात्रता स्पर्धा होतील. स्पर्धेचे आयोजक सिंगापूर बॅडमिंटन संघटना व जागतिक बॅडमिंटन संघटनेने (बीडब्ल्यूएफ) प्रवासबंदीमुळे १ ते ६ जूनदरम्यान होणारी ही सिंगापूर ओपन स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला.

ही सुपर ५०० स्पर्धा बीडब्ल्यूएफ जागतिक टूरचा भाग होती. यातून मिळणारे क्रमवारी गुण टोकियाे ऑलिम्पिक पात्रतेमध्ये जोडले जाणार होते. बीडब्ल्यूएफने म्हटले की, ‘आम्ही सर्व खेळाडू, ऑफिशियल्स, स्थानिक लोकांच्या आरोग्याचा विचार करून ही स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला. ही स्पर्धा पुन्हा होणार नाही, हेदेखील जाहीर करतो. आम्ही टोकियाे ऑलिम्पिकच्या पात्रतेबद्दल नंतर घोषणा करणार आहोत.’ मलेशिया ओपन रद्द झाल्यानंतर सायना व श्रीकांतकडे ही अखेरची संधी होती. पी.व्ही. सिंधू, बी. साईप्रणीत, चिराग शेट्टी-सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी यांनी ऑलिम्पिकचा कोटा मिळवला आहे.

बातम्या आणखी आहेत...