आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Sakshi Malik Asked PM Narendra Modi For Arjuna Award News Updates Sakshi Malik Question To PM Modi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेसलर साक्षी मलिक नाराज:कोणते पदक जिंकल्यावर अर्जुन पुरस्कार मिळेल ?; नाराज साक्षी मलिकचा थेट पंतप्रधान मोदींना प्रश्न

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रेसलर साक्षी मलिकला 2016 मध्येच क्रिडा क्षेत्रातील सर्वोच्च खेळरत्न पुरस्कार मिळाला आहे

नुकतंच क्रिडा पुरस्कारांची घोषणा झाली. यात महिला रेसलिंगमध्ये देशाला ओलिंपिक मेडल जिंकून देणारी साक्षी मलिकला अर्जुन पुरस्कार न मिळाल्यामुळे नाराज झाली आहे. यामुळे साक्षीने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच प्रश्न केला आहे. खरतर साक्षीला 2016 मध्येच क्रिडा क्षेत्रातील सर्वोच्च खेळरत्न पुरस्कार मिळाला आहे, पण साक्षीला अर्जुन पुरस्काराची इच्छा आहे. यावरुन साक्षीने मोदींना विचारले की, असे कोणते पदक जिंकून येऊ, जेणेकरुन मला अर्जुन पुरस्कार मिळेल ?

साक्षीने यावर्षी अर्जुन पुरस्कारासाठी अर्ज केला होता. क्रिडा मंत्रालयाच्या स्पेशल कमेटीने 29 खेळाडूंसह साक्षीच्या नावाची शिफारस केली होती. परंतू, अंतिम यादीतून साक्षीचे नाव हटवण्यात आले.यामुळे नाराज झालेल्या साक्षीने ट्वीटद्वारे थेट पंतप्रधानांना सवाल केला आहे.

मीराबाई चानूचेही नाव यादीतून हटवले

2018 मध्ये भारतीय महिला वेटलिफ्टर मीराबाई चानूला खेळरत्न मिळाला होता. त्यामुळे तिचेही नाव अर्जुन अवॉर्डच्या फायनल लिस्टमधून हटवण्यात आले आहे.