आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Sakshi, Rehan, Qualifies For East State Tournament In Divisional School Squash Tournament

स्क्वॉश:विभागीय शालेय स्क्वॉश स्पर्धेत साक्षी, रेहान, पूर्वा राज्य स्पर्धेस पात्र

छत्रपती संभाजीनगर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणीत झालेल्या विभागीय शालेय स्क्वॉश स्पर्धेत औरंगाबाद पोलिस पब्लिक स्कूलच्या ६ खेळाडूंनी सुवर्णपदक जिंकले. या कामगिरीमुळे त्यांची अमरावती येथे होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी निवड झाली. यात १४ वर्षे गटात साक्षी गायकवाड, १७ वर्षे गटात अश्विरा बेग, ऋचा वराळे, रेहान बेग व १९ वर्षे गटात पूर्वा मानकापे, रुद्राक्ष लाेखंडे यांचा समावेश आहे. त्यांना प्रशिक्षक डॉ. रोहित गाडेकर यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंचे शाळेचे संचालक रणजित दास, मुख्याध्यापिका गीता दामोदरन, किरण चव्हाण आदींनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...