आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजपासून टी-20 वर्ल्डकप सुरुवात:भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशी सानिया मिर्झा राहणार सोशल मीडियापासून लांब, इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत सांगितले कारण

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजपासून टी-20 वर्ल्डकपला सुरुवात होत आहे. त्यातच टीम इंडियाचा पहिला सामना 24 ऑक्टोंबरला पाकिस्तान सोबत होणार आहे. त्यादिवशी भारतीय टेनिस खेळाडू सानिया मिर्झा सोशल मीडियापासून लांब राहणार आहे. भारत-पाकिस्तान सामनादरम्यान सोशल मीडियावरील चुकीची माहिती, अफवा यापासून वाचण्यासाठी सानिया हा निर्णय घेतला आहे.

कारण जेव्हा-जेव्हा भारत-पाकिस्तान सामना होता. तेव्हा-तेव्हा सानिया सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल होते. कारण सानिया मुळात भारतातली आहे. मात्र तिचे लग्न पाकिस्तानचा खेळाडू शोएब मलिक याच्यासोबत झाले आहे. सानिया ही भारतासाठी टेनिस खेळते तर तिचा नवरा शोएब हा पाकिस्तानसाठी क्रिकेट खेळतो. त्यामुळे नेटकरी तिला जास्तच ट्रोल करतात.

काय म्हणाली सानिया
सानिया मिर्झाने इंस्टाग्रामवर पोस्ट करत म्हटले आहे की, 'भारत-पाकिस्तान क्रिकेट सामनादरम्यान सोशल मीडियावर दोन्ही देशात होणाऱ्या वादग्रस्त वातावरणातून वाचण्यासाठी मी सामन्याच्या दिवशी सोशल मीडियावर नसणार आहे' अशी पोस्ट सानियाने केली आहे. सानिया मिर्झाने पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब मलिकसोबत लग्न केले आहे. शोएब हा टी-20 वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानसाठी क्रिकेट खेळत आहे.

2009 मध्ये पाकिस्तानने जिंकला होता वर्ल्डकप
पाकिस्तानने 2009 साली वर्ल्ड कप जिंकला होता. त्यावेळी शोएब मलिकने कमालीची भुमिका बजावली होती. तर 2007 साली पहिल्यांदा सुरु झालेल्या टी-20 वर्ल्ड कपसाठी पाकिस्तान टीमचा कर्णधार म्हणून शोएबला घोषित केले होते. या वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाला होता. 2007 पासून वर्ल्डकपला सुरुवात झाली असून, आतापर्यंत 06 वर्ल्डकप पार पडले आहे. त्यापैकी 5 वर्ल्डकपमध्ये मलिकने पाकिस्तान टीमची धुरा सांभाळली आहे. त्याच्याकडे 22 वर्षाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा अनुभव आहे.

बातम्या आणखी आहेत...