आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Sarvadoor Mallakhamba Will Spread The Popularity Of The Game In America: Patankar

निर्धार:अमेरिकेत सर्वदूर मल्लखांब खेळाची लोकप्रियता पोहोचवणार : पाटणकर

दिव्य मराठी नेटवर्क | मुंबई25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेतील मल्लखांबची वाढती लोकप्रियता लक्षणीयरीत्या वाढवण्याच्या निर्धाराने, अमेरिकन मल्लखांब महासंघाने खेळाची व्याप्ती आणखीन वाढविण्यासाठी विविध योजना आखल्या आहेत. तळागाळात, अमेरिकेमध्ये या खेळाचा प्रसार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, ज्यामध्ये अमेरिकेच्या राज्यस्तरीय महासंघाने आधीच एकूण दहा खेळाचा प्रसार केला आहे, अशी माहिती अमेरिकेतील मुख्य प्रशिक्षक चिन्मय पाटणकर यांनी दिली. याशिवाय २०२८ लॉस एंजिलिस ऑलिम्पिकमध्ये मल्लखांबला प्रदर्शनीय खेळ म्हणून मार्ग सुकर करण्यासाठी स्थानिक महासंघ पुढाकार घेत असल्याचीही माहिती त्यांनी यादरम्यान दिली.

सध्या महाराष्ट्र ऑलिम्पिक महासंघाच्या सहकार्याने काम करत आहे. अमेरिकन मल्लखांबमहासंघाकडे भविष्यात चढाई करण्यासाठी एक ध्येय आहे. यासाठी महाराष्ट्र ऑलम्पिक महासंघाने संपूर्ण पाठिंबा दर्शविला आहे, असा विश्वास ऑलम्पिक महासंघाचे अध्यक्ष अजित पवार दिला आहे.