आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Satish Completed The Lonavala Tata Ultra Marathon In 4 Hours And 58 Minutes

टाटा अल्ट्रा मॅरेथॉन:सतीशने 4 तास 58 मिनिटांत पूर्ण  केली लोणावळा टाटा अल्ट्रा मॅरेथॉन

छत्रपती संभाजीनगर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील लांब पल्ल्याचे धावपटू सतीश यादव लोणावळा टाटा अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये अव्वल ठरले. ही स्पर्धा दोन गटांत पार पडली असून पहिली स्पर्धा ५० किमीची २.३० वाजता तर दुसरी ३५ किमीची ४.५० वाजता सुरुवात झाली. सतीश यादव यांनी ५० किमीची मॅरेथाॅन ४ तास ५८ मिनिटांत पूर्ण केली. ५० किमी अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये विनय अग्रवाल, उदय देशपांडे, पंडित सोन्ने, प्रशांत राऊत, भाऊसाहेब गवळी, बालाजी नारागुडे, सुधीर कुलकर्णी, संदीप गाभणे, जी.बी. वामन, गुंजन पाटील आणि ३५ किमी हाफ अल्ट्रा मॅरेथॉन डॉ. अजित घुले, चंद्रशेखर संगेवार, परिणीता खैरनार, मधुकर जाधव, कविता जाधव, वैशाली आघाव, सोनम शर्मा, शरद गोयल, श्याम पाटील, गोपाळ पवार, भगवंत बोराखडीकर, रणजित मिश्रा, विजय आघाव आदी धावटूंनी यशस्वीरीत्या पूर्ण केली.

बातम्या आणखी आहेत...