आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहॉकी इंडियाने बुधवारी २० सदस्यीय भारतीय महिला हॉकी संघ जाहीर केला. संघ व्हॅलेसिया (स्पेन) येथे ११ डिसेंबरपासून सुरू हाेणाऱ्या एफआयएच नेशन्स कपमध्ये सहभागी होईल. अनुभवी गोलरक्षक सविता पुनिया संघाचे नेतृत्व करेल. दुसरीकडे, मिडफील्डर नवज्योत कौरने संघात पुनरागमन केले. ती कॉमनवेल्थमध्ये सहभागी भारतीय संघाची सदस्य नव्हती. डिफेंडर एक्काला उपकर्णधार बनवले. या स्पर्धेतील विजेता संघ २०२३-२४ सत्रातील महिला प्राे लीगसाठी पात्र ठरेल. या स्पर्धेत भारताच्या ब गटात चिली, जपान व द. आफ्रिका आहेत.भारत ११ नोव्हेंबरला अभियान सुरु करेल.
भारतीय संघ : गोलरक्षक सविता (कर्णधार), बिछू देवी. डिफेंडर दीप ग्रेस एक्का, गुरजीत कौर, निक्की प्रधान, उदिता, ईशिका चौधरी. मिडफील्डर निशा, सलिमा टेटे, सुशीला चानू, मोनिका, नेहा, सोनिका, ज्योती, नवज्योत कौर. फॉरवर्ड वंदना कटारिया, लालरेमसियामी, नवनीत कौर, संगीता कुमारी आणि ब्यूटी डुंंगडुंग.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.