आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
गेल्या वेळी सिमोन मिग्नोलेट माद्रिदमध्ये पोडियमवर चॅम्पियन लीग चॅम्पियन बनल्यानंतर जल्लोष करत होते, पदक त्यांच्या गळात होते, लिव्हरपूलच्या सहकाऱ्यांसोबत ते मैदानावर फिरून चाहत्यांना अभिवादन करत होते, चाहते लाल जर्सीमध्ये विजेता संघाला प्रोत्साहन देत होते, पार्टी दुसऱ्या दिवसापर्यंत चालू होती. मात्र, यंदा अनेक गोष्टी बदलल्या आहेत. मिग्नोलेट घरची होते, तेव्हा त्यांच्या मोबाइल स्क्रीनवर संदेश आला. हा व्हाॅट्सअॅप संदेश त्यांच्या नवा क्लबच्या संचालकाचा होता. बेल्जियमच्या मिग्नोलेटने गेल्या बदली सत्रात लिव्हरपूल सोडून घरचा क्लब ब्रजेस सोबत जोडला होता. संदेश होता, सत्र रद्द झाले आहे आणि आम्हाला विजेता घोषित केले आहे. काही वेळेत त्यांच्या मोबाइलवर शुभेच्छा संदेश आणि इमोजीने भरून गेला. सर्वजण एकमेकांना शुभेच्छा देत हाेते. मिग्नोलेट आणि त्याच्या संघातील सर्व सदस्य आपल्या यशावर गर्व करत होते. ही पहिली वेळ होती, जेव्हा मिग्नोलेटने राष्ट्रीय चॅम्पियनशिप जिंकली होती. मिग्नोलेट सांगतात की - “ही काही विजयाची, काही मिळवल्याची भावना होती. हा किताब जिंकण्यापूर्वी वाटत होते, काही तरी कमी आहे. मात्र, विजयानंतर जाणवले की, मी परीक्षा उत्तीर्ण झालोे.’
गेल्या काही आठवड्यात यूरोपमधील अनेक खेळाडू अशाच प्रकारच्या काळातून गेले आहेत, जसे मिग्नोलेट व त्यांचे सहकारी गेले. अनेक खेळाडूंना संदेशाद्वारे ते चॅम्पियन बनल्याची बातमी मिळाली. क्लब ब्रजेस पहिली टीम होती, ज्यांना संदेशातून अशी माहिती मिळाली. त्यानंतर अनेक क्लब ज्यात जोडले गेले. फ्रान्सच्या सरकारने घरची फुटबॉल लीग लीग वनला रद्द केले आणि पॅरिस सेंट जर्मनला (पीएसजी) अव्वल स्थानी असल्याने विजेता घोषित केले. हा त्यांचा ८ वर्षांतील सातवा लीग १ किताब होता.
या सर्व संघातील खेळाडूंनी देखील तोच अनुभव घेतला, जो मिग्नोलेटने घेतला होता. त्यांना आपल्या खेळावर गर्व आहे, यशावर संतुष्ट झाले, चॅम्पियन बनल्यावर आनंद झाला, मात्र त्यांच्या सर्व भावना आपापसात मिळत्या-जुळत्या होत्या. कारण, त्यांनी अशात विजयाची अाशा केली नव्हती. हे अंतर आहे फक्त, मिळवलेल्या विजयात आणि घोषित केलेल्या विजयात. दुसरीकडे, स्कॉटलंडमध्ये सेल्टिकचा कर्णधार स्कॉट ब्राउनला केवळ ट्रॉफीच दिली नाही तर, ट्रॉफी प्रत्येक खेळाडूंच्या घरी नेली, कारण त्यांचे संपूर्ण कुटुंबाने हा आनंद साजरा करावा. ही स्कॉट ब्राउनची सेल्टिक सोबत दहावी चॅम्पियनशिप होती, कर्णधार म्हणून सलग नववी.
स्कॉटलंडचा क्लब सेल्टिकने नवव्यांदा जिंकला किताब
स्कॉटलंडच्या क्लबने देखील पुढे न खेळण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर सेल्टिकला विजेता घोषित केले. सेल्टिक नवव्यांदा चॅम्पियन बनला. फ्रेंच क्लब लियोन, इंग्लिश क्लब चेल्सी आणि स्पॅनिश क्लब बार्सिलोनाच्या महिला संघाचे सत्र पूर्ण झाले नाही आणि त्यांना विजेता घोषित केले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.