आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Second Consecutive Multi sport Event Postponed, Tokyo Olympics Also Postponed For A Year; Composite Reactions Of Players

कोरोना महामारीचा फटका:सलग दुसरा मल्टी स्‍पोर्ट्स इव्हेंट स्थगित, टोकियॉ ऑलिम्पिकही झाले होते वर्षभरासाठी स्थगित

नवी दिल्ली13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना महामारीचा वाढता धाेका लक्षात घेऊन हांगऊ एशियन गेम्सला अनिश्चित काळासाठी स्थगिती देण्यात आली. चीनमध्ये सध्या कोरोनाचा धाेका वेगाने वाढत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून ऑलिम्पिक काैन्सिल ऑफ एशियाने आपल्या बैठकीत स्पर्धा स्थगितीचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे आता चीनमध्ये होणाऱ्या १९ व्या एशियन गेम्सला स्थगिती देण्यात आली. यंदा ही स्पर्धा १० ते २५ सप्टेंबरदरम्यान चीनमध्ये आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत यजमान चीनसह ४५ देशांचे जवळपास ११ हजार खेळाडू सहभागी होणार होते. भारतीय संघाने या स्पर्धेतील सात इव्हेंटसाठी आपला प्रवेश निश्चित केला आहे. भारतीय संघाने २०१८ मध्ये जकार्ता येथील एशियन गेम्समध्ये १६ सुवर्णांसह ७० पदकांची कमाई केली. यासह भारतीय संघ पदकतालिकेत आठव्या स्थानी होता. कोरोना महामारीमुळे सलग दुसरा मल्टी स्‍पोर्ट््स इव्हेंट स्थगित करण्यात आला. २०२० मध्ये टोकियो ऑलिम्पिक आयोजनाला वर्षभरासाठी स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

टोकियो ऑलिम्पिकमधील कामगिरीने पदकाची आशा
भारताने गतवर्षी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सर्वाेत्तम यश संपादन केले. नीरज चाेप्राने पहिल्यांदाच अॅथलेटिक्समध्ये सुवर्णपदक मिळवून दिले. त्याचा निश्चित असा मोठा फायदा एशियन गेम्समध्ये होणार आहे.

या खेळाडूंसाठी स्थगितीचा निर्णय सकारात्मक
एशियन गेम्सचे आयोजन स्थगित करण्याच्या निर्णयाकडे सकारात्मक नजरेतून पाहण्याची गरज आहे. यातून तयारीसाठी अधिक वेळ मिळणार आहे. या वेळेत आपल्या कामगिरीचा दर्जा उंचावण्यास मदत होते. याचा प्रत्यय टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान अाला. हाॅकी टीमने मिळालेल्या वेळेत कसून सराव केला. त्यामुळे टीमची कामगिरी काैतुकास्पद ठरली.
पीआर श्रीजेश, गाेलरक्षक, हाॅकी

या सुपरस्टार खेळाडूंनी व्यक्त केली प्रचंड नाराजी

दाेन महिन्यांपर्यंतची स्थगिती योग्य ठरली असती, मात्र आता वर्षभरासाठीचा निर्णय धक्कादायक आहे. यामुळे कामगिरीमध्ये सातत्य ठेवणे जिकिरीचे ठरते. याचा निश्चित मोठा विपरीत परिणाम कामगिरीवर पडण्याचा धाेका आहे. वेळेबरोबरच पैसाही मोठ्या प्रमाणात खर्च होताे. तसेच प्रायोजकत्वही अडचणीत येते. त्यामुळे आर्थिक संकट समोर उभे राहणार आहे. दूती चंद, २०१८ गेम्स, राैप्य विजेती

एशियन गेम्स 2022 स्थगित
ऑलिम्पिक चॅम्पियन भालाफेकपटू नीरज आता तुर्कीत कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स व वर्ल्ड चॅम्पियनशिपची तयारी करत आहे.
स्पर्धा स्थगितीच्या निर्णयाने मी काहीशी निराश झाले आहे. गत दाेन वर्षांपासून मोठ्या स्पर्धेत सहभागी होता आले नाही. त्यामुळेच आम्ही एशियन गेम्समधील सर्वाेत्तम कामगिरीवर फोकस केला होता. आता यात नव्याने अडचण निर्माण झाली आहे. याशिवाय अनिश्चित काळासाठी स्पर्धा स्थगितीने कामगिरीवर परिणाम पडणार आहे. त्यामुळे मोठे नुकसान होईल.

जाॅन्सन, एशियन चॅम्पियन
स्थगितीमुळे आता पुन्हा नव्याने डावपेच आखावे लागणार आहेत. याशिवाय मला आपला फाॅर्म कायम ठेवण्यासाठी वर्षभर स्पर्धेत सहभागी व्हावे लागणार आहे. ऑलिम्पिक तयारी करत असलेल्या जलतरणपटूंसाठी हा निर्णय योग्य आहे. मात्र, इतरांना याचा मोठा फटका बसणार आहे. कारण काही जणांनी फक्त आशियाई स्पर्धेपर्यंतचे टार्गेट ठेवलेले आहे.

साजन , ऑलिम्पियन जलतरणपटू
स्पर्धेच्या स्थगितीमुळे आता माझा वर्कलाेड काहीसा कमी होणार आहे. एशियन गेम्सपूर्वी राष्ट्रकुल स्पर्धा होणार आहे. त्यामुळे आता याच स्पर्धेतील सर्वाेत्तम कामगिरीवर मी फोकस करणार आहे. याचा मला चांगल्या प्रकारे फायदा होईल. फाॅर्म टिकवून ठेवण्यासाठी मी आता कसून मेहनत घेणार आहे. याचा निश्चित मोठा फायदा कामगिरीला होईल.
श्रीशंकर, उंच उडी,राष्ट्रीय विक्रमवीर

भारतीय खेळाडू तिरंदाजी, बॅडमिंटन, ब्रिज, ई-स्पोर्ट््स, गोल्फ, हॉकी, साॅफ्टबॉल खेळात पात्र ठरले आहेत.

बातम्या आणखी आहेत...