आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशिया कप:भारतीय महिला संघाचा दुसरा विजय; मलेशिया संघ पराभूत

सिलहट2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सलामीच्या विजयाने आत्मविश्वास द्विगुणित झालेल्या भारतीय महिला संघाने साेमवारी आशिया कपमध्ये दुसरा सामना जिंकला. भारतीय संघाने स्पर्धेतील आपल्या दुसऱ्या सामन्यामध्ये मलेशियाला धूळ चारली. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारताने ३० धावांनी सामना जिंकला. भारताने डकवर्थ लुईसच्या नियमातून सामना आपल्या नावे केला. प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित २० षटकांत ४ बाद १८१ धावा काढल्या हाेत्या. दरम्यान, प्रत्युत्तरात मलेशियाने ५.२ षटकांत २ बाद १६ धावा काढल्या. या वेळी पावसाचा व्यत्यय आला. त्यामुळे सामन्याला पुन्हा सुरुवात हाेऊ शकली नाही.

बातम्या आणखी आहेत...