आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Selection Of National Champion Riya Nafde For Asian Gymnastics Championships

निवड:राष्ट्रीय चॅम्पियन रिया नाफडेची एशियन जिम्नॅस्टिक स्पर्धेसाठी निवड

आैरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

युवा खेळाडू रिया नाफडेची आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. पटाया (थायलंड) येथे ३ ते ५ सप्टेंबरदरम्यान एशियन जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले असून रिया या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करेल. तिने चंदीगड येथे राष्ट्रीय एरोबिक्स जिम्नॅस्टिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. यामुळे तिची राष्ट्रीय संघात निवड झाली आहे. ती द जैन इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता सातवीची विद्यार्थिनी आहे. तिच्या या निवडीबद्दल संस्थेचे सीईओ चंद्रशेखर डी.पी., शाळेच्या सीओओ शिखा श्रीवास्तवा, प्राचार्य प्रवीण सोनावणे, दीप्ती सराफ, दुर्गा सिग्नपूरकर, रेखा ठाकूर, राहुल श्रीरामवार, अनिकेश शुक्ला आदींनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...