आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्णधार हॅरी केनने आपल्या सर्वाेत्तम खेळी आणि कुशल नेतृत्वातून इंग्लंड संघाला फिफा विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठून दिली. इंग्लंड संघाने रविवारी मध्यरात्री सेनेगलवर मात केली. इंग्लंड संघाने ३-० अशा फरकाने एकतर्फी विजय साजरा केला. मिडफील्डर जाॅर्डन हँडरसन (३८ वा मि.), कर्णधार हॅरी केन (४५+३ वा मि.) आणि बुकायाे साकाने (५७ वा मि.) प्रत्येकी एक गाेल करत इंग्लंडला दणदणीत विजय मिळवून दिला. शेवटच्या मिनिटापर्यंत पिछाडीवर पडलेल्या सेनेगल संघाला सामन्यात गाेलचे खाते उघडता आले नाही. या पराभवासह टीमला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. यासह इंग्लंड संघाला सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकपच्या अंतिम आठमधील आपला प्रवेश निश्चित करता आला. इंग्लंडला आता उपांत्यपूर्व सामन्यात गत चॅम्पियन फ्रान्स टीमच्या आव्हानाला सामाेरे जावे लागेल. हे दाेन्ही संघ येत्या रविवारी अंतिम आठच्या लढतीत समाेरासमाेेर असतील. इंग्लंड संघाने दमदार सुरुवात करताना बाॅलवर नियत्रंण मिळवले. यासह इंग्लंड टीमने ३८ व्या मिनिटाला सामन्यात आघाडी घेतली.
थ्री लायन्सचा गेम आॅफ ३ इंग्लंड संघाने प्री-क्वार्टर फायनलमध्ये ३-० ने सेनेगलवर मात केली. इंग्लंडने गटातील सामन्यातही वेल्सवर ३-० ने विजय मिळवला हाेता. थ्री लाायन्स नावाने प्रसिद्ध असलेल्या इंग्लंड संघातील फाॅरवर्ड रॅशफाेर्डच्या नावे सर्वाधिक ३ गाेल आहेत. त्यापाठाेपाठ बुकायाे साकाही तीन गाेलसह आघाडीवर आहे.
भुरट्या चाेराचा रहीमला धक्का; घरातील चाेरीमुळे मायदेशी इंग्लंडला रवाना इंग्लंड संघाच्या फाॅरवर्ड रहीम स्टर्लिंगला भुरट्या चाेरांमुळे मनस्तापाला सामाेरे जावे लागले. त्याच्या इंग्लंडमधील घरी चाेरांनी हात साफ केला. यादरम्यान त्यांनी शस्त्रांचा धाक दाखवून घरामध्ये चाेरी केली आहे. ही घटना घडल्यामुळे रहिमच्या कुटंुबीय प्रचंड घाबरले आहेत. यामुळे आता त्याला तत्काळ मायदेशी रवाना व्हावे लागले. याप्रकरणी सध्या स्थानिक पाेलिस तपास करत आहेत. ताे आता पुढच्या सामन्यादरम्यान खेळताना दिसणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.